शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करा, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली सूचना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 18, 2023 17:57 IST

मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली

सिंधुदुर्ग : प्रांताधिकारी आणि तहसिलदारांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेवून सतर्क करावे, त्याच बरोबर  तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करुन सादर करावेत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केली.मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आज, मंगळवारी घेण्यात आली. बैठकीला प्रांताधिकारी जगदीश कातकर, प्रशांत पानवेकर, ऐश्वर्या काळुशे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे यांच्यासह सर्व तहसिलदार व खाते प्रमुख उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी स्वागत करुन आपदा मित्रांच्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे म्हणाले, सर्व नियंत्रण कक्ष व यंत्रणांच्या संपर्क क्रमांकासह पुस्तिका बनवावी. आपत्ती काळात कोणीही मुख्यालय सोडू नये. जिल्हा परिषद तसेच नगर परिषद आरोग्य विभागाने शुध्द पाणी पुरवठा करावा. साथरोग नियंत्रणाबाबत नियोजन करावे. शालेय विभागाने शाळा सुस्थितीत ठेवाव्यात. नगर परिषद, ग्रामपंचायत यांनी नाले सफाई, धोकादायक इमारतीबाबत उपाययोजना कराव्यात. पाटबंधारे विभागाने धरणांमधील पाणीसाठ्याच्या विसर्गाचे नियोजन करावे. प्रांताधिकारी  कातकर यांनीही यावेळी सूचना केल्या. ते म्हणाले, पोलीस, कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महावितरण यांनी आपल्याकडील साहित्य साधन-सामग्री तपासावी. नियंत्रण कक्ष सुरु करण्यासाठी नियोजन करावे.प्रांताधिकारी पानवेकर म्हणाले, नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व्हायला हवे. तलाठी, ग्रामसेवक यांचा गावात संपर्क हवा. फोन बंद होणे, न उचलणे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सॅटेलाईट फोन वापरावयाचे प्रशिक्षण घ्या. बी.एस.एन.एल. रेल्वे, विद्यूत वितरण, उपप्रादेशिक परिवहन विभाग, बंदर विभाग आदी विभागांनाही यावेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग