शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मुख्याध्यापकांकडून अपहा

By admin | Updated: November 6, 2015 00:01 IST

रदेवगड पंचायत समिती सभा : सदस्यांनी केला आरोप; कारवाई करण्याचे सभापतींचे आश्वासन

देवगड : शिरगाव निमतवाडी प्राथमिक शाळेतील शैक्षणिक उठाव या उपक्रम निधीमधूून शाळेच्या मुख्याध्यापकांनी बेहिशोबी १८ हजार रूपयांची रक्कम खात्यावरून दीड वर्षापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरी सहीत काढली होती. मात्र त्याचा अद्यापही हिशेब त्या मुख्याध्यापकाने दाखविला नाही. यामुळे अपहार केल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य रवींद्र जोगल यांनी केला. याचे उत्तर देताना सभापतींनी चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.देवगड पंचायत समिती सभेची मासिक बैठक समितीच्या किसान भवन सभागृहात डॉ. मनोज सारंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती स्मिता राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते. यावर सभापती डॉ. सारंग म्हणाले की, अशा शैक्षणिक उठाव निधीमधून बेजबाबदारपणे खर्च करणाऱ्या शिक्षकांना पाठीशी घालणार नसून अशा बेजबाबदार शिक्षकांमुळे कित्येक वेळा लोकप्रतिनिधी अडचणीत येत असून असा अपहार, नियमीतपणे केलेल्या मुख्याध्यापकावर ठोस कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. तसेच तालुक्यातील ज्या शाळांमध्ये असे अपहार, अनियमितता आढळल्यास अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश सभागृहाला दिले. तसेच ज्या शिक्षकांनी भ्रष्टाचार केला आहे अशा शिक्षकांवर योग्य ती कारवाई करण्याचा ठराव सभागृहात घेण्यात आला. शिरगाव निमतवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी २० मार्च २०१४ रोजी शैक्षणिक उठाव निधीच्या खात्यामधून २२ हजार ५०० रूपये दोन्हींच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. ४ हजार ५०० रूपयांचे शैक्षणिक उपयुक्त वस्तू खरेदी करण्यात आल्या व १५ हजार रूपये खुर्ची व टेबलसाठी अ‍ॅॅडव्हान्स व्यापाऱ्याला दिले. आणि तीन हजार रूपये मुख्याध्यापकांनी स्वत:जवळ ठेवले आहेत. दीड वर्षे होऊन गेले तरी अ‍ॅडव्हान्स भरून १५ हजार रूपयांच्या खुर्च्या व टेबले व्यापाऱ्याने दिले नसल्याचे विस्तार अधिकारी प्रजापती थोरात यांनी मुख्याध्यापक यांच्या जबाबानुसार सभागृहाला माहिती दिली. यावरती पंचायत समिती सदस्य रविंंद्र जोगल आक्रमक होऊन अपहार झाला असल्याचे सांगून त्या मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्याचा ठराव मांडून तो ठराव सर्वानुमते घेण्यात आला.तालुक्यात एम.आर.जी.एस. च्या माध्यमातून तालुक्यात गुरांचे गोठे बांधणे ही योजना राबविण्यात येते. मात्र, जिल्हा परिषदेच्या चुकीच्या मुल्यांकनामुळे तालुक्यात जिल्हा परिषदच्या माध्यमातून एकही गोठा बांधण्यात आला नाही. कारण देवगड जिल्हा परिषद विभागाने एम.आर.जी.एस. च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ७० हजारापैकी ६९ हजार हे गोठ्याच्या बांधकामासाठी मुल्यांकन करण्यात आले व ९४१ रूपये हे मजुरीवर खर्च दाखविण्यात आल्याने देण्यात येणारी मजुरी ही तुटपुंजी असल्यामुळे तालुक्यात एकही गोठा बांधला गेला नाही. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये या योजनेसाठी कणकवली तालुक्यात ५९ हजार रूपये गोठ्यासाठी तर २१ हजार मजुरीसाठी तसेच सावंतवाडी तालुक्यात ४८ हजार रूपये गोठ्यासाठी तर २२ हजार मजुरीसाठी दाखविण्यात आले आहेत. मात्र देवगड तालुक्यात इतर तालुक्यांपेक्षा कमी मजुरी दाखविल्यामुळे या योजनेचा लाभ अथवा लाभार्थ्यांना अनुदान देण्यात अडचण येत असल्याचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले. तालुक्यातील कुठलीही संघटना आल्यास प्रथम गटविकास अधिकारी यांची भेट घेते. मात्र प्रशासनाचा प्रमुख म्हणून सभापती यांना सन्मान दिला जात नसेल तर आम्हाला या गोष्टीचा विचार केला गेला पाहीजे. प्रत्येक संघटना प्रथम गटविकास अधिकारी यांची भेट घेत असेल तर याचाच अर्थ प्रशासन कोण चालवतो असा सवाल जोगल यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)ग्रामपंचायती आॅनलाईन करणार : सहकार्य करा देवगड तालुक्यातील सर्व ७४ ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बी.एस.एन.एल.चे उपअभियंता संभाजी सतरकर यांनी केले आहे.पोषण आहार बंद का झाला ? असा प्रश्न हर्षा ठाकूर यांनी उपस्थित केला. उत्तर देताना विस्तार अधिकारी थोरात यांनी सांगितले की, डाळीचे दर वाढल्याने पुरवठादारांनी पुरवठा करणे बंद केले आहे. डाळीचे दर कमी होताच शाळांमध्ये पोषण आहार पुन्हा सुरू होईल असे त्यांनी सांगितले.