शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

भाजपमध्ये आल्यावर चौकशी थांबणार नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Updated: August 13, 2022 19:08 IST

विरोधी पक्षच 'अशा' अफवा पसरवत असतो

सावंतवाडी : ज्या नेत्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहेत. त्यांची चौकशी भाजपात आल्यावर कुठे थांबणार नाही. कोट्यावधीचे भ्रष्टाचार करायचे आणि ईडीने कारवाई केल्यानंतर आम्ही चोरी केली नाही असं सांगायचे. मग महाराष्ट्रात खासदारासह माजी मंत्री जेलमध्ये कसे गेले असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंत्री मिश्रा म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण एकही मंत्र्यावर आरोप झाला नाही. मात्र काही राज्यात विरोधी पक्षाची सत्ता आहे तेथे अनेक मंत्री, आमदार, खासदार वेगवेगळ्या आरोपात अडकले आहेत. ज्याच्यावर कारवाई होते ते भाजपच्या नावाने ओरड मारतात मग चोरी कशासाठी करायची असा सवाल केला. तर ज्यांच्या चौकशी सुरू आहेत त्याची कुठेही चौकशी थांबणार नसल्याचेही ते म्हणाले. भाजपकडे आले म्हणून चौकशी थांबतात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर कोणालाही चौकशीवर संशय असेल किंवा समाधानी नसाल तर यंत्रणे विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असेही ते म्हणाले.विरोधी पक्षच अशा अफवा पसरवत असतोभाजपमध्ये गेल्यावर नेते सुटतात असे सामान्य माणूस म्हणत नाही, त्यांना काही देणे घेणेही नसते. पण विरोधी पक्षच या अफवा पसरवत असतो. कोणी कितीही ओपनिय पोल काढू दे पण राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि पुन्हा राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.'हे' कितपत योग्यराज्यात निवडणुकीपूर्वी भाजपशी युती करायची आणि नंतर ज्याच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबत सरकार बनवायचे हे कितपत योग्य आहे. आताचे शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत असून ते यापुढे ही चांगले काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, महेश सारंग, शैलेंद्र दळवी, मनिष दळवी, संजू परब लखमसावंत भोसले, राजन म्हापसेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHome Ministryगृह मंत्रालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय