शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

देवी भराडी, आमच्याशी सूडबुद्धीने वागणाऱ्यांना दीर्घायुष्य दे !, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं आंगणेवाडीत साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:03 IST

यापूर्वी हा जिल्हा कुठे होता आणि आता कुठे आहे याची तुलना प्रत्येकाने करावी

मालवण : दीड दिवस चालणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी सहकुटुंब या जत्रेला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, माझ्याशी राजकारणात सूडबुद्धीने वागणाऱ्या, मला अडचणीत आणायचा प्रयत्न करून द्वेषाची भावना ठेवणाऱ्यांना देवीने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य देवो आणि राणे कुटुंबियांना या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जाण्याची ताकद देवो, असे साकडे आपण देवीला घालत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री राणेंनी व्यक्त केली.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज, गुरुवारी दुपारी आंगणेवाडी जत्रेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत नीलम राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार शाम सावंत, रवी शेडगे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मालवण पं. स. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, श्रीमती आसावरी राजोपाध्याय, अशोक सावंत, दीपक आंगणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने राणे कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, आतापर्यंत मी विविध क्षेत्रात जे यश संपादन केले आहे, त्यामध्ये आई भराडी देवीचा आशीर्वाद आहे, अशी माझी भावना आहे. म्हणूनच आमदार झाल्या पासून दरवर्षी मी न चुकता आंगणेवाडी देवीच्या जत्रेला येतो. देवीच्या आशीर्वादामुळे गेली ३५ वर्षे मी कोकणात कार्यरत असून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे काम माझ्या हातून होत आहे.मी केंद्रात लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळत असून देशातील ८० टक्के उद्योग या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. या मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही ना. राणे यांनी दिली. आजपर्यंत या जिल्ह्यासाठी, या भागासाठी मी काय काय केले हे मी सांगणार नाही, परंतु यापूर्वी हा जिल्हा कुठे होता आणि आता कुठे आहे याची तुलना प्रत्येकाने करावी, असेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे