शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन, चार बोटींवर कारवाई 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 5, 2023 14:15 IST

मालवण ( सिंधुदुर्ग ): कालावल खाडीपात्रात अनधिकृत रित्या वाळु उत्खनन सुरू आहे. यावर स्थानिक महसूल यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने ...

मालवण (सिंधुदुर्ग): कालावल खाडीपात्रात अनधिकृत रित्या वाळु उत्खनन सुरू आहे. यावर स्थानिक महसूल यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने संतप्त बनलेल्या खोत जुवा बेट येथील महिला व ग्रामस्थ यांनी मालवण तहसील कार्यालय येथे धडक देत तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली.दरम्यान, तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व टीम घटनास्थळी पोहचले. काही बोटी खाडी पात्रात वाळू उत्खनन करत असल्याचे दिसून आले. त्यांचा पाठलाग करण्यात आला. चार बोटींवर यावेळी कारवाई करण्यात आली तर काही बोटी पळून गेल्या. कारवाई सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. कारवाई होऊनही वाळू उत्खनन सुरू राहिल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडले जाईल. असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे. यावेळी खोत जुवा बेट येथील रहिवाशी महिला ग्रामस्थ यांनी अनधिकृत वाळू उत्खनन प्रश्नी समस्या, तक्रारींचा पाढा वाचला. वाळू उत्खनन कामगार यांच्या वर्तणूक बाबतही महिलांनी तक्रारी केल्या. एकूणच सर्व तक्रारी ऐकून घेत कारवाई धडक करण्याबाबत तहसीलदार यांनी ग्रामस्थांना आश्वासीत केले.अनधिकृत वाळू उत्खनन होत असलेल्या परिसरात महसूल यंत्रणा माध्यमातून सतत गस्त व पाहणी केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांवर तसेच किनाऱ्यावर नोंदणी नसलेल्या अज्ञात स्वरूपात असलेल्या होड्यावर कारवाई केली जाईल. तसेच बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या वाळू उत्खनन कामगार तसेच त्यांनी बेकायदेशीर उभारलेल्या झोपड्या यावरही कारवाई करून त्यांना त्यांच्या प्रांतात पाठवण्या बाबत महसूल पोलिस यंत्रणेला तहसीलदार वर्षा झालटे यांनी सूचना दिल्या आहेत.

छोट्या बोटीतून खाडीपात्राची पाहणीतहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांसोबत छोट्या बोटीतून कालावल खाडी पात्रात पाहणी केली. कुठे कुठे अनधिकृत स्वरूपात वाळू उत्खनन होते. होड्यातील वाळू कुठे उतरवली जाते. याबाबत प्रत्यक्ष पाहणीत माहिती घेतली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsandवाळूMining Scamखाण घोटाळा