शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg News: अनधिकृत वाळू उत्खनन बोटींवर महिलांची धडक, बोटींचे नांगर घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:35 IST

दरम्यान वाळू उत्खनन बोटींनी पळ काढला.

मालवण : मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खननामुळे पाणखोल जुवा येथे धोका पोहोचत आहे. वारंवार सांगूनही अनधिकृत वाळू उत्खनन बंद न झाल्याने याठिकाणच्या महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट खाडीपात्रात जात वाळू उत्खनन करणाऱ्या बोटीचे नांगर ताब्यात घेतले. दरम्यान, मालवण तहसीलदार श्रीपाद पाटील यांना महिलांनी घटनास्थळी येण्याची विनंती केली. तहसीलदार येताच जप्त केलेले नांगर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, या दरम्यान वाळू उत्खनन बोटींनी पळ काढला.सुमारे १० ते १५ बोटी व ६० ते ७० परप्रांतीय कामगार होते. रोज अनधिकृत स्वरूपात केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननामुळे पाणखोल जुवा बेटाची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे वाळू उत्खनन थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महिलांनी आक्रमक व धाडसी भूमिका घेत वाळू उत्खनन बोटींचे नांगर ताब्यात घेतले.तहसीलदार तत्काळ घटनास्थळीमहसूल प्रशासन येईपर्यंत परप्रांतीय कामगारांनी खाडीपात्रातून बोटी पळविल्या. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत महिलांनी जप्त केलेले नांगर महसूल विभागाच्या ताब्यात घेतले. दरम्यान, मेरिटाइम बोर्ड यांच्याकडून बेकायदेशीर वाळू उत्खनन बोटींवर कारवाई होत नसल्याने आणि पोलिस प्रशासनाकडून परप्रांतीय मजुरांवर कारवाई केली जात नसल्याने वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप आक्रमक महिलांनी केला आहे.बेटाची धूपपाणखोल जुवा बेटाच्या परिसरात सतत होत असलेल्या वाळू उत्खननामुळे बेटाची धूप होत असल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. मात्र, रात्रीच्यावेळी होणाऱ्या वाळू उत्खननामुळे नागरिक त्रस्त झाल्याने महिलांनी कायदा हातात घेतला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग