शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

Sindhudurg: साडेतीन लाखांचा अवैध खतसाठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 3, 2025 19:28 IST

सिंधुदुर्ग  : देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ३.३१ लाख रुपये किमतीचा अनधिकृत खतसाठा ...

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ३.३१ लाख रुपये किमतीचा अनधिकृत खतसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, यांना कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषिसेवा केंद्र या निविष्ठा केंद्राचे नजीकच्या शेतमांगरात कृषिसेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल, (रा. कुणकेश्वर कातवणेश्वर ता. देवगड) हे अवैधरीत्या रासायनिक व सेंद्रिय खताचा साठा व विक्री करत असल्याचे दिसून आले. संबधितांना विचारणा केली असता त्यांच्या जवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले.

खतांच्या अवैध विक्रीला आळा बसेलकृषी विभागाच्या धडक कारवाईमुळे खतांच्या अवैध विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

असा होता अवैध खतसाठाशेतमांगराची तपासणी केली असता त्यामध्ये- महाराष्ट्र बायो फर्टिलायजर इंडिया प्रा. लि या कंपनीचे ब्राउन गोल्ड ऑरगॅनिक म्यँनुअर प्रत्येकी ५० किलो बॅग प्रत्येक बॅगची किंमत ९७५ रुपये असे एकूण १५६ बॅगची मिळून किंमत सुमारे १ लाख ५२ हजार १०० रुपये, यारा फर्टिलायजर इंडिया प्रा. लि. या कंपनीचे एनपीके १२:११:१८ या ग्रेडची प्रत्येकी २५ किलो बॅग, प्रत्येक बॅगची किंमत ३२०० रुपये असे एकूण ५६ बॅग मिळून किंमत सुमारे १ लाख ७९ हजार २०० असा एकूण ३ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा अवैध खतसाठा आढळून आलेला आहे.

हा अवैध खतसाठा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी स्थानिक पंच, पोलिस उपनिरीक्षक आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती देवगड यांच्या समवेत पंचनामा करून शेतमांगर सील करण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग