कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, रविवारी मुंबई येथे मातोश्री बंगल्यावर सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत शिवसेना संघटनेचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'होऊ दे चर्चा' अभियान चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. तसेच लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर, मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक
By सुधीर राणे | Updated: October 9, 2023 18:14 IST