शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा

By सुधीर राणे | Updated: June 17, 2024 15:04 IST

कणकवली: इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा उद्धवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव झाला. ...

कणकवली: इंडिया आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा उद्धवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असताना संदेश पारकर यांनी संघटनात्मक बांधणी करत पक्षाला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा विजय झाला. त्यातच कणकवली विधानसभा मतदार संघ व जिल्ह्यातून मोठे मताधिक्य राणेंना मिळाले. त्यामुळे राऊत यांचा पराभव झाल्याचे शल्य मनात बाळगुन संदेश पारकर यांनी नैतिकता जोपासत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांचे लक्ष वेधले आहे. त्याची प्रत उद्धवसेना पक्ष सचिव विनायक राऊत, जिल्हासंपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनाही पाठवली आहे. त्यामुळे  उद्धवसेनेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, विनायक राऊत यांचा पराभव झाल्याने शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय पक्षाच्या बैठकांमध्ये विनायक राऊत हे सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांना एका पराभवाने खचून न जाता आगामी निवडूकांसाठी सज्ज व्हा असे आवाहन करतात तर दुसरीकडे त्या बैठकांमध्ये उपस्थित असलेले जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे पदाचा राजीनामा देत जबाबदारीतुन मुक्त होण्याची जाहिर भुमिका घेताना दिसत आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSandesh Parkarसंदेश पारकर