शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत बांधकाम व्यावसायिकाला दागिन्यांसह लुटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:51 IST

सावंतवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांसह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील नानापाणीजवळ घडला.

ठळक मुद्देआंबोलीत बांधकाम व्यावसायिकाला दागिन्यांसह लुटण्याचा प्रकारघटना : रोकड लंपास, अपघाताचा केला बहाणा

आंबोली : सावंतवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांसह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील नानापाणीजवळ घडला.ते व्यावसायिक आपल्या घरातील नातेवाईकांसह पुणे येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना आंबोली येथे नानापाणी वळणावर झालेल्या एका अपघातामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे त्यांनी आपली गाडी थांबवून अपघाताची माहिती घेत असताना मागून भरधाव येणाऱ्या एका कर्नाटक पासिंग डंपरने त्यांच्या कारला मागून धडक दिली. अपघाताचा आवाज येताच त्यांनी त्यांना विचारणा करण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली.यावेळी कारमधील दोघांनी ह्यत्याह्ण व्यावसायिकाच्या गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तर अन्य तिघांनी त्यांच्या गळ््यात व हातात असलेले सोन्याचे दागिने खेचून घेतले व डंपर घेऊन तेथून पलायन केले. यावेळी ते व्यावसायिक हे कुटुंबासमवेत असल्यामुळे तसेच परिसरात रेंज नसल्यामुळे तेथे फोन करू शकले नाहीत. सायंकाळी उशिरा त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.दरम्यान, सायंकाळी उशिरा स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यानी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती. हे प्रकरण उशिरापर्यंत सुरू होते.

आंबोली घाटातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हमंगळवारी इचलकरंजी येथील एका व्यावसायिकाला पाच जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असताना बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे आंबोली घाटातील सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग