शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 22:03 IST

जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुख्य धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील (३५) व अवधूत महादेव शिंदे (३२, दोघे रा. निपाणी-बेळगाव) येथील आहेत.

सावंतवाडी, दि. 10 - जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुख्य धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील (३५) व अवधूत महादेव शिंदे (३२, दोघे रा. निपाणी-बेळगाव) येथील आहेत.रविवार असल्याने आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी असते. आजही मोठ्या प्रमाणात पर्यटक आंबोली परिसरात आले होते. सकाळपासूनच पर्यटकांची मोठी वर्दळ होती. सकाळी आंबोलीत पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटला. मात्र सायंकाळच्या सुमारास आंबोलीत पावसाचा जोर वाढला होता. आंबोलीत ज्या पद्धतीने पाऊस कोसळत होता, तसाच तो चौकूळ परिसरातही कोसळत होता.त्यामुळे आंबोलीच्या मुख्य धबधब्यावर असलेले दरडीचे दोन दगड सरळ खाली आले आणि आंघोळ करीत असलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडले. यात प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील  व अवधूत महादेव शिंदे हे दोघेही जखमी झाले आहेत. या दोघांच्या डोक्यात दगड पडल्याचे बघून स्थानिक पर्यटकांनी त्यांना प्रथम आंबोली येथील रुग्णालयानंतर सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे त्यांना दाखल करण्यात आले आहे. उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या घटनेबाबत पोलिसात कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.