शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: रानडुकराच्या मासांची विक्री करणारे फोंडाघाट येथील दोघेजण ताब्यात

By सुधीर राणे | Updated: February 22, 2024 14:31 IST

कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

कणकवली : फोंडाघाट, कासारवाडी येथे अवैधरित्या शिकार करुन रानडुकर या वन्यप्राण्याचे मांस विकत असल्याची कणकवली वनक्षेत्रपाल यांना गुप्त माहिती मिळाली होती. वनपाल, वनरक्षक यांच्या समवेत तत्काळ घटनास्थळी जावून वस्तुस्थीतीची खात्री केली तसेच दोघांना ताब्यात घेतले आहे. गुरुनाथ मधुकर येंडे व  चंद्रकांत शांताराम शिरवलकर (दोघेही रा. फोंडा) अशी त्यांची नावे आहेत.  गुरुनाथ येंडे यांच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये  रानडुकराचे मांस ठेवल्याचे वनाधिकाऱ्याना आढळुन आले. ते मांस काळ्या रंगाच्या ३७ पिशव्यामध्ये होते.  ते ताब्यात घेण्यात आले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर  गुरुनाथ येंडे यांच्यासह चंद्रकांत शिरवलकर यांनी ते मांस राधानगरी येथाल विजय नामक व्यक्तीकडून बुधवारी सकाळी घेतल्याचे सांगितले. ते विकत घेतलेले मांस बारिक तुकडे करुन विक्री करण्याच्या उद्देशाने विकत घेतले होते.  तसेच विजय याला दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.

गुरुनाथ येंडे यांच्यासह चंद्रकांत  शिरवलकर यांनी वन्यप्राणी रानडुकराचे मांस अवैधरित्या खरेदीचा व्यवहार करुन तो बाजारात विकण्याचा त्यांचा हेतू होता. त्या दोघानी गुन्हा कबुल केल्याने त्यांच्यावर वन्यप्राणी रानडुकराच्या मृत्युस व शिकारीस कारणीभुत ठरल्याने  वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.या गुन्ह्याबाबत उपवनसंरक्षक  नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, वनपरिमंडळ अधिकारी धुळु कोळेकर, अतुल खोत व वनसेवक सुधाकर सावंत  यांनी कारवाई केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी