शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संतोष परब हल्लाप्रकरणातील आणखीन दोन आरोपीना अखेर अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 22:44 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब  यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. या घटनेतील पसार  असलेल्या पुणे येथील दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी उशिरा अटक केली.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब  यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. या घटनेतील पसार  असलेल्या पुणे येथील दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी उशिरा अटक केली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणुरे (३४ ), धीरज व्यंकटेश जाधव (३६, दोन्ही रा.पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. करंजे येथील मूळ रहिवासी असलेले संतोष परब हे सध्या कणकवली येथे रहातात. त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात एकूण ११  आरोपी पोलिसांनी तपासा दरम्यान निष्पन्न केले होते. त्यातील पाचजण न्यायालयीन कोठडीत असून चौघांची  जामिनावर मुक्तता झाली आहे . तर आता पसार असलेले उर्वरीत दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.संतोष परब यांच्यावर हल्ल्याची घटना १ डिसेंबर २०२१ रोजी नरडवे रोडवर रेल्वे स्टेशननजीक घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तीन आरोपींना अटक केली होती. तसेच  एका आरोपीला दोन दिवसांनी अटक करण्यात आली होती. तर आणखी एक आरोपी  सचिन सातपुते याला काही दिवसांनी दिल्ली येथे अटक करण्यात आली होती. 

त्याचप्रमाणे संतोष परब हल्लाप्रकरणात संशयित  म्हणून आमदार नितेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, आमदार राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांचीही नावे होती. त्यातील मनिष दळवी यांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला होता. तर आमदार नितेश राणे, संदेश सावंत, राकेश परब यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर सध्या ते जामिनावर मुक्त आहेत. या गुन्ह्यात ज्ञानेश्वर उर्फ माऊली देवणुरे आणि धीरज जाधव हे पुण्यातील दोन्ही आरोपी पसार झाले होते. अखेर तीन महिन्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग