शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डेगवेत २२ लाखांची दारू जप्त, कंटेनर ताब्यात : सांगलीमधील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:53 IST

गोवा बनावटीच्या दारूची सांगलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाने डेगवेत रविवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ३४ हजार चारशे रुपयांची दारू व १० लाखांचा कंटेनर असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी सुरेश तानाजी पवार (२३) व अजित बाळसो सावंत (२८, दोघेही रा. बनाळी, ता. जत, जि. सांगली) यांच्यावर अटकेची कारवाई केली.

ठळक मुद्देडेगवेत २२ लाखांची दारू जप्त, कंटेनर ताब्यात सांगलीमधील दोघांना अटक

बांदा : गोवा बनावटीच्या दारूची सांगलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाने डेगवेत रविवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ३४ हजार चारशे रुपयांची दारू व १० लाखांचा कंटेनर असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी सुरेश तानाजी पवार (२३) व अजित बाळसो सावंत (२८, दोघेही रा. बनाळी, ता. जत, जि. सांगली) यांच्यावर अटकेची कारवाई केली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला बांद्याहून दोडामार्गच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकातील कर्मचारी बांदा-दोडामार्ग मार्गावरील डेगवे येथे सापळा रचून होते.

वाहनांची कसून तपासणी सुरु होती. बांद्याहून दोडामार्गच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच १० डब्लू ७९६१) कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता पाठीमागील हौद्यात ताडपत्रीच्या खाली दारूचे बॉक्स लपवून ठेवलेले निदर्शनास आले.यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे ३२० बॉक्स आढळून आले. सदरच्या दारूची किंमत २२ लाख ३४ हजार ४०० रुपये असून गाडीची किंमत १० लाख असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल उत्पादन शुल्कने ताब्यात घेतला.ही कारवाई दुय्यम निरीक्षक ए. आर. जगताप, एन. पी. रोटे. ,सी. डी. पवार, सी. एल. कदम, चालक एच. आर. वस्त, प्रसाद माळी, शिवशंकर मुपडे, यांच्यासह कुडाळ कार्यालय पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली. या विभागाचे कर्मचारी गाड्या तपासणी करताना दिसत नाहीत.

या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आर्शिवादाने राजरोसपणे दारु वाहतुक होत असते असा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळेच कुडाळ कार्यालयाच्या पथकाने यांच्या हद्दीत येऊन नाकावर टिच्चून कारवाई केली. त्यामुळे इन्सुली उत्पादन शुल्कचा सुस्त कारभार समोर आला आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग