शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:59 IST

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-टाकेवाडी येथे अवघड वळणावर दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात सुदर्शन सुभाष वाघरे (१८, रा. मधलीवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला वैभव विश्वनाथ गाडे (१७, रा. गाडेवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देदुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघातात युवक ठारखारेपाटण येथील दुर्घटना, एक गंभीर 

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-टाकेवाडी येथे अवघड वळणावर दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात सुदर्शन सुभाष वाघरे (१८, रा. मधलीवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला वैभव विश्वनाथ गाडे (१७, रा. गाडेवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला आहे.खारेपाटण टाकेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या या अपघाताची माहिती ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र व खारेपाटण पोलीस ठाण्याला दिली. पोलीस कॉन्स्टेबल उध्दव साबळे यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची माहिती घेतली.

या अपघातात वाघरे याचा जागीच मृत्यू झाला, तर गाडे हा गंभीर जखमी झाला. येथील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी अपघातग्रस्तांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी प्राथमिक उपचार करून जखमी वैभव गाडे याला पुढील उपचारासाठी कणकवली येथे पाठविले. या अपघातातील दोघे युवक राजापूरहून खारेपाटणच्या दिशेने येत असताना रस्त्यानजीक असलेल्या सुरक्षा लोखंडी रॉडवर त्यांची दुचाकी आदळली.यामध्ये वाघारे याच्या छाती व नाकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव गाडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यला कणकवली येथे हलविण्यात आले आहे.खारेपाटण महाविद्यालयाचा विद्यार्थीमृत सुदर्शन वाघरे यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. वाघरे हा खारेपाटण महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम वर्षात शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे. तर जखमी वैभव गाडे हा येथील प्र. ला. पाटील तांत्रिक महाविद्यालयात अकरावी अ‍ॅटो वर्गात शिकत आहे.

खारेपाटण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. डी. कांबळे व प्रा. दयानंद कोकाटे यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन माहिती घेतली व नातेवाईकांना कल्पना दिली. अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग