शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या गव्याच्या दोन पिल्लांना जीवदान, मात्र एकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 19:05 IST

सावंतवाडी : माजगाव मेट वाडा येथे गव्याची दोन पिल्ले विहिरीत पडल्याचे काल, सोमवारी निदर्शनास आले होते. या पिल्लांना बाहेर ...

सावंतवाडी : माजगाव मेट वाडा येथे गव्याची दोन पिल्ले विहिरीत पडल्याचे काल, सोमवारी निदर्शनास आले होते. या पिल्लांना बाहेर काढून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदानही दिले होते. मात्र आज, मंगळवारी सकाळी आणखी एक पिल्लू  विहिरीत मृतावस्थेत पाण्यात तरंगताना आढळून आले.गव्याची तीन पिल्ले अंदाज न आल्याने विहिरीत पडली होती. त्यातील दोन पिल्ले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत दोरीच्या साह्याने बाहेर काढली. रेस्क्यू टीमने दोन पिल्लांना जीवदान दिले पण तिसऱ्या पिल्ला बाबत कोणालाच माहिती मिळाली नाही. त्यामुळेच ही टीम निघून गेली.गव्याची पिल्ले पडलेली ही विहिर तब्बल चाळीस फूट खोल आहे. या विहिरीत चिखल देखील असल्याने एक पिल्लू बुडल्याने थेट तळाला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज ते फुगल्याने वर आल्याने स्थानिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाला याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत पिल्लाला बाहेर काढले. त्यानंतर त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून घेण्यात आले. त्या पिल्लाचा मृत्यू कशामुळे झाला याचा वनविभागाकडून शोध घेतला जाणार आहे.विहिरीला जाळी बसवणारनरेंद्र डोंगरातून गवारेडयाचा हा कळप रात्रीच्या वेळी सावंतवाडी शिरोडा मार्गावरून थेट माजगाव मध्ये येतो. हा कळप पाण्याच्या शोधात येत असावा असा अंदाज आहे. यादरम्यान, वाटेवरील विहिरीत पिल्ले पडली. वनविभागाकडून त्या विहिरीला जाळी बसवण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग