शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खैरतोड प्रकरणातील फरार दोघा संशयितांना पकडले, वनविभागाची कारवाई

By अनंत खं.जाधव | Updated: August 22, 2023 16:43 IST

चौकशीअंती अटक

सावंतवाडी : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात अनधिकृत पणे खैराची तोड प्रकरणातील फरार आरोपी  संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे (दोघे रा.वेत्ये सावंतवाडी) या दोघाही आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले. काल, सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर यातील लहू गावडे हा सध्या जामीनावर बाहेर आहे.इन्सुली येथील वनरक्षक संग्राम पाटील यांना क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात फिरती करताना काही लोक खैराची तोड करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी भ्रमणध्वनीवरून कोलगाव वनरक्षक सागर भोजने यांना मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर या दोघांनी मिळून राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या आरोपींवर  झडप घालून रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. पण यातील दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. तर तिसरा आरोपी लवू एकनाथ गावडे याला ताब्यात घेण्यात आले होते. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.फरार आरोपीचा शोध सुरू होता. ते वेत्ये येथील आहेत. त्यामुळे सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीमसह वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर पसार झालेल्याचा शोध घेत होते. त्यातच सोमवारी संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे हे दोघेही वनविभागाच्या पथकाला आढळून आले असून वनविभागाकडून त्याना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची अधिक चौकशी सुरू असून त्याना अटक ही करण्यात आले आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.हा तपास सावंतवाडी उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल-पृथ्वीराज प्रताप, प्रमोद राणे, वनरक्षक-संग्राम पाटील, सागर भोजने, अप्पासो राठोड, चंद्रकांत पडते हे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग