शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जाधव यांना संकुलात स्टॉल देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:21 IST

Sawantwadi Sindhudurg-सावंतवाडी नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात रवी जाधव यांना जागा देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. तसा प्रस्ताव नगरपालिका बैठकीत आणून विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दलित पँथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई जाधव यांना दिले आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सकारात्मक दलित पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

सावंतवाडी : नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात रवी जाधव यांना जागा देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. तसा प्रस्ताव नगरपालिका बैठकीत आणून विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दलित पँथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई जाधव यांना दिले आहे.

याबाबत दलित पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत येऊन नगराध्यक्षांची भेट घेत स्टॉलची मागणी केली होती. यावेळी कोकण प्रदेशाध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे, निखिल मोहिते, दयानंद कांबळी यांच्यासह माजी नगसेवक संजय पेडणेकर, तानाजी वाडकर, सुनील पेडणेकर आदी उपस्थित होते.दलित पँथरचे भाई जाधव म्हणाले, रवी जाधव हा एक दलित समाजातील तरुण आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करू नका. त्याला न्याय द्या. या मागणीला मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर नगराध्यक्ष परब यांच्याकडे हा विषय मांडण्यात आला.यावेळी परब म्हणाले, आपण पालिका बैठकीत ठराव घेऊन पुढील निर्णय घेऊ. पुन्हा या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली यात जाधव यांच्यावर पालिकेकडून अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच त्यांची मागणी पालिका प्रशासन ऐकत नसल्यास त्या ठिकाणी डीक्रीच्या जागेत असलेले सर्व गाळे काढूून टाकण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी आपण पालिका प्रशासन व नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून ओटे देण्याचे मान्य केले होते. मात्र, त्यांनी ते नाकारले होते, असे मुख्याधिकारी जावडेकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर आपण याबाबत नगराध्यक्षांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. नगराध्यक्ष परब यांच्याशी चर्चा केली. यावेळी ठरल्याप्रमाणे जाधव यांना पालिकेच्या संकुलात गाळा देण्याबाबत सकारात्मक ठराव पालिकेच्या बैठकीत घेण्यात येईल. तो ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परब यांनी सांगितले. दरम्यान, बैठक सुरू असतनाच किरकोळ कारणाने नगरसेवक व स्टॉलधारक रवी जाधव यांच्यात तू तू-मै मै झाले. त्यानंतरही नगराध्यक्षांनीही बाजू सावरून धरत आम्ही मागणीचा विचार करू, अशी ग्वाही दिली 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग