शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पर्यावरण समतोलासाठी स्वत:पासून प्रयत्न करा

By admin | Updated: June 9, 2016 01:54 IST

मधुकर बाचुळकर : पर्यावरण सप्ताहानिमित्त सिंधुदुर्गनगरीत चर्चासत्र

सिंधुदुर्गनगरी : पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर या वसुंधरेवरील सजीव सृष्टीसमोर भविष्यात मोठी संकटे येतील. याचा गांभिर्याने विचार करून कोणी काही तरी करेल यापेक्षा आपण यासाठी काय करू शकतो याचा विचार करा. केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता सजीव सृष्टीसाठी व भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरूवात करा, असे आवाहन जेष्ठ संशोधक प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर यांनी येथे केले.पर्यावरण सप्ताहानिमित्त येथील नवीन नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप या विषयावर डॉ. बाचुळकर बोलत होते. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तथापि सध्याच्या काळात पर्यावरण समतोल ही मानवाच्या दृष्टीकोनातून तसेच या पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी महत्वाची गरज असल्याचे सांगून डॉ. बाचुळकर म्हणाले की, वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेल्या गरजा, वाढते शहरीकरण, कार्बनडॉयआॅक्साईडचे उत्सर्जन, जंगलांचा ऱ्हास, जंगलातील वणवे, वाढते तापमान, कचरा, ई-कचरा, प्लास्टिकचा अतोनात वापर आदींमुळे पर्यावरणास हानी पोहचत आहे.पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे तसेच विविध वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या ओझोन वायूच्या आवरणाला खिंडार पडले आहे. यामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण तडक पृथ्वीवर येतात. यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका आहे. तापमान वाढीने उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे देशातील समुद्र किनाऱ्यावरील लोकवस्ती पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. समुद्र्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. या सर्वांचा प्रत्येकाने विचार करायला हवा असे सांगून डॉ. बाचुळकर म्हणाले की, वृक्ष लागवड करणे, तो वृक्ष सुव्यवस्थित वाढविणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, क्लोरोफ्युरो कार्बन उत्सर्जित करणाऱ्या साधनांचा वापर टाळणे, सौर उर्जेचा वापर वाढविणे, वाहनांचा वापर कमीत - कमी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, यासारखे वैयक्तिक स्तरावर आपण प्रयत्न केल्यास पर्यावरण पूरक कार्यास आपण निश्चित हातभार लावू शकतो.निसर्गात दोन घटक महत्वाचे आहेत निर्जीव व सजीव. निर्जीव म्हणजे पंचमहाभूते यामध्ये हवा, पाणी, जमिन-माती, प्रकाश व उर्जा. या पाच बाबी प्रदूषणमुक्त ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे. असे सांगून बाचुळकर म्हणाले की, लोकसंख्या वाढती त्याप्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती वाढत नाही. नैसर्गिक चक्र अबाधित राखून पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लागवड व त्याची जपणूक करावी असेही त्यांनी स्पष्ट केले. वामन पंडीत यांनी प्रारंभी डॉ. बाचुळकर यांचा परिचय करून दिला. निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी स्वागत केले. या व्याख्यानास जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)