शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:48 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्दे वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचणवाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही त्रास

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.कणकवलीत मुंबई - गोवा महामार्गाबरोबरच आचरा रस्त्यावरही वाहतुक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे. नरडवे नाका ते मुख्य चौकापर्यंत प्रवास करायचा म्हटल्यावर कणकवलीतील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून या रस्त्यावर आपला जीव केव्हा जाईल? हे सांगता येत नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.या मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. त्याचे परिणाम वाहतूक कोंडीवर दिसुन येत आहेत. तसेच या महामार्गावर विक्रेते , व्यावसायिक यांचे अतिक्रमण देखील मोठया प्रमाणात झाले असुन त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.चौपदरीकरणकामाबाबत नाराजीकणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना सर्वसामान्य जनता, वाहन चालक व पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेणे आवश्यक आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी चौपदरीकरणाच्या कामासाठी आवश्यक तेवढी जागा मिळाल्यानंतर स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष केला आहे. त्याबद्दल कणकवलीकरांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली असून त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.शहरात वाहतूक पोलिसांची आवश्यकता!कणकवली शहरातील मुख्य चौकात दोन वाहतूक पोलीस असतात. मात्र, डीपी रोड, छत्रपती शिवाजी चौक , नरडवे नाका याठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. असे झाले तर वाहतुकीचे सुनियोजन होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग