शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजना चालविणे अवघड

By admin | Updated: December 5, 2014 23:27 IST

जलव्यवस्थापन समिती सभा : विजयदुर्ग, देवगड नळयोजनेबाबत प्रश्नचिन्ह

सिंधुदुर्गनगरी : विजयदुर्ग आणि देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या लाभार्थींकडून पाणीपट्टी भरली जात नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनास या योजना चालविणे आता डोईजड बनल्या असल्याचे शुक्रवारच्या सभेत उघड झाले. या दोन्ही योजनांवर आतापर्यंत तब्बल ८१ लाख रूपये खर्च झाले असून केवळ साडेसहा लाख रूपये पाणीपट्टी वसूल झाली आहे. वसुली होत नसेल तर या योजना कशा चालवाव्यात, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे सभेत स्पष्ट झाले.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजीत देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सदस्य वासुदेव परब, जनार्दन तेली आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.देवगड आणि विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेवर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्राप्त होणारा देखभाल दुरूस्तीचा निधी गेली अनेक वर्षे खर्च केला जात आहे. दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करूनही या योजनेतील लाभार्थ्यांच्या पाण्याच्या समस्या कायम आहेत. या योजनेत समाविष्ट असलेल्या गावांतील लाभार्थींना पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. मात्र, पाणीपट्टी वसुली होत नाही. आतापर्यंत केवळ १० टक्केच वसुली झाली असल्याची माहिती सभेत देण्यात आली. देवगड आणि विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेसाठी चालू वर्षात ८१ लाख निधी खर्च झाला आहे. तर केवळ ६ लाख ५० हजार एवढीच पाणीपट्टी वसुली झाली आहे. पाण्याचा वापर केला जात असताना लाभार्थींकडून पाणीपट्टी भरली जात नसेल तर या योजना चालविणे जिल्हा परिषद प्रशासनाला डोईजड बनत आहेत. तरी देवगड व विजयदुर्ग नळपाणी योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक लावून या योजना सुरू ठेवाव्यात की बंद कराव्यात, याबाबत निर्णय घेतला जाईल. संबंधित लाभार्थ्यांचे पाणीपट्टी वसुलीसाठी सहकार्य नसेल तर या योजना तोट्यात चालविणे आता शक्य नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी जलव्यवस्थापन समिती सभेत स्पष्ट केले.जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या चिरेखाणी आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा साठा होऊ शकतो. यासाठी नवीन योजना तयार करण्याचे ठरवून देवगड, मळेवाड येथे प्रायोगिक तत्त्वावर अशा चिरेखाणींमध्ये पाणीसाठा करण्यासाठीचे ३३ लाख ७० हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. एकूण खर्च आणि साठा होणारे पाणी पाहता ६६ पैसे प्रतिलिटर पाणी साठा होऊ शकेल. मात्र, त्यानंतर प्रतिवर्षी नि:शुल्क पाणीसाठा होऊ शकेल, अशी माहिती सभेत देण्यात आली. (प्रतिनिधी)पाण्यासाठी खास उपाययोजना करा : सावंतसंभाव्य पाणीटंचाईचा आराखडा बनविताना गेल्यावर्षी टंचाईतील जी कामे करता आली नाहीत अशी कामे यावर्षी प्राधान्याने घ्या. तसेच ज्या दुर्गम वाडी-वस्तीमध्ये पाण्याची सोय नाही, अशा वाड्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी खास उपाययोजना तयार करा. एकही वस्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्या, असे आदेश अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.