शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आरे देवीचीवाडी येथे त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:44 IST

देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ, मुंबईच्यावतीने ११ मे रोजी त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रात्री १० वाजता श्री पावणादेवी मंदिराच्या भव्य सभामंडपात तिरंगी भजनाचा सामना होणार आहे.

ठळक मुद्देआरे देवीचीवाडी येथे त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन १०मे पासून विविध कार्यक्रम ; तिरंगी भजन सामन्याचे आकर्षण

कणकवली : देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ, मुंबईच्यावतीने ११ मे रोजी त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रात्री १० वाजता श्री पावणादेवी मंदिराच्या भव्य सभामंडपात तिरंगी भजनाचा सामना होणार आहे.श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ, मुंबईच्यावतीने देवीच्या वाडीतील ग्रामस्थांच्या विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून त्रैेवार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच जिल्ह्याबाहेर काम धंद्याच्या निमित्ताने असलेले आरे देवीचीवाडी येथील रहिवासी आपल्या कुटुंबियांसह गावात दाखल होत असतात. तसेच आपल्या आप्तस्वकीयांशी हितगुज साधत असतात.त्रैेवार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने १०मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून श्री पावणादेवी मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होईल. ११ मे रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, तिर्थप्रसाद, सायंकाळी ६वाजता दिंडी कार्यक्रम, सायंकाळी ७वाजता स्नेह संमेलन व बक्षीस समारंभ ,रात्री १० वाजता तिरंगी भजनाचा सामना होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.तिरंगी भजन सामन्याचे आकर्षण !आरे देवीचीवाडी येथे खुडी येथील श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संतोष जोईल (भजन सम्राट श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य ) , खांबाळे येथील श्री गावदेवी प्रासादीक भजन मंडळाचे बुवा संजय पवार(भजनसम्राट भगवान लोकरे यांचे शिष्य ), राजापूर ,केळवली येथील गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाचे बुवा गणेश जांभळे (भजन सम्राट प्रमोद हर्याण यांचे शिष्य )यांच्यात तिरंगी भजन सामना रंगणार आहे. या तिरंगी भजन सामन्याचे खास आकर्षण भजन रसिकांसाठी आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग