शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

शासनाच्या योजना घराघरांत पोहोचवा

By admin | Updated: January 29, 2015 00:19 IST

दीपक केसरकर : जिल्ह्यातील विविध पुरस्कारप्राप्तांचा गौरव

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून सर्वांना परिचित आहे. शासनातर्फे विविध अभियानातही जिल्हा अग्रस्थानी आहे. जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधी व स्थानिक लोकांच्या सहकार्याने शासनाच्या प्रत्येक योजना घराघरांत पोहोचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री तथा वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा पोलीस ग्राऊंड येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केसरकर बोलत होते. आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच पत्रकार उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेला जिल्हा आहे. स्वच्छतेतून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण जिल्हा स्वच्छतेकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील एकूण ४३३ ग्रामपंचायतींपैकी ३३८ ग्रामपंचायतींनी निर्मलग्राम पुरस्कार पटकावला असून, उर्वरित ९५ ग्रामपंचायती निर्मलग्राम करून संपूर्ण जिल्हा निर्मलग्राम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेने जास्तीत जास्त प्रभावीपणे काम करावे. यावेळी जिल्हा आरोग्य विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा परिषद स्वच्छ भारत पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन, पर्यटन महोत्सव २०१५ चे दोन चित्ररथांचे संचलन पार पडले. यावेळी अ‍ॅन्झिलीम गर्ल्स प्रमोशन सेंटर, रानबांबुळी, तसेच डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)