शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात काळ्या फिती लावून व्यवहार, बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:11 IST

BharatBand, FarmarStrike, Sindhudurgnews केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र सुरू आहे. सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय करत असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात काळ्या फिती लावून व्यवहारबंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

सिंधुदुर्ग : केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र सुरू आहे. सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय करत असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली.शेतकरी कायद्याच्या विरोधातील भारत बंद आंदोलनाला मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, जलक्रीडा व्यावसायिक, श्रमिक मच्छीमार संघाने आपला पाठींबा दर्शविला आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, जलक्रीडा प्रकार बंद ठेवण्यात आले आहेत.

मालवणात पर्यटकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत, मात्र त्यांना किल्ले दर्शन व जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटता न आल्याने हिरमोड झाला आहे. अनेक पर्यटकानी बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गला अभिवादन केले. भारत बंदचा मालवण बाजारपेठेवर कोणताही परिणाम जाणवला नाही. बाजारपेठ गजबजली दिसून येत होती. पोलीस प्रशासनानेही प्रमुख नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.ओरोस मुख्यालय चौकात रोजच्या प्रमाणे सर्व हॉटेल्स, इतर दुकानं सुरू आहेत. नागरिका,पर्यटकही मोठ्या संख्येने वर्दळ सुरू आहे. या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला नाही. शिरगांव येथील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ, सर्व व्यापारी अस्थापना, दुकाने सुरू आहेत.

दूध, भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध असून बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही, जनजीवन सुरळीत असून एसटी सेवाही सुरू आहेत. खारेपाटणमध्ये भारत बंदचा कोणताही परिणाम नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. कणकवलीतही नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून येत आहे. कसाल गाव बाजारपेठ येथे नेहमीप्रमाणे सर्व दुकाने सुरु आहेत.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदKankavliकणकवलीFarmer strikeशेतकरी संपsindhudurgसिंधुदुर्ग