शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कुडाळात वाहतूक कोंडी

By admin | Updated: November 16, 2014 23:44 IST

अतिक्रमण वाढले : भोगटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले

कुडाळ : कुडाळातील वाढते अतिक्रमण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा वाहतुकीचा खोळंबा आदी समस्यांबाबत कुडाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी पोलीस उपअधीक्षक व वाहतूक नियंत्रक विभागप्रमुख यांचे लक्ष वेधले. यावेळी पोलीस उपअधीक्षक यांनी या संदर्भात संबंधित विभागाची बैठक बोलावून या समस्या निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन भोगटे यांना दिले. कुडाळमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत आहेत. ही अतिक्रमणे वेळीच हटवावीत, यासाठी अनेक निवेदने, उपोषणे करण्यात आली. मात्र, संबंधित बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. तसेच सर्व शासनाचे विभाग जबाबदारी झटकत आहेत. यामुळे या शहरातील गाड्या पार्किंगचा प्रश्न वाढला असून कुडाळ पोलीस ठाणे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या शहरातील मार्गावर दिवसभर अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यामुळे पादचारी, रुग्ण, विद्यार्थी तसेच वाहन चालक यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. शिवाय ध्वनी, वायू प्रदूषण होते, अशी कैफियत कुडाळ पोलीस ठाणे येथे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे व वाहतूक नियंत्रक विभागाचे प्रमुख राजेंद्रकुमार परदेशी यांच्यासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी मांडली. गेल्या चतुर्थीत कुडाळ पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी केलेले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. परंतु त्यानंतर त्यामध्ये सातत्य राहिले नाही, याबाबत भोगटे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी उपअधीक्षक गणेश इंगळे म्हणाले की, येथील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे ही समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून यासंदर्भात शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व संबंधित विभागाचे अधिकारी यांची एकत्र बैठक लावणार असल्याचे सांगितले. वाहतूक नियंत्रक विभाग प्रमुख राजेंद्रकुमार परदेशी यांनी, आमच्या विभागाच्यावतीनेही चांगले सहकार्य देण्यात येईल व येथील वाहतूक कोंडीची समस्या चांगल्याप्रकारे सुटल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे, असे सांगितले. यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक आर. पी. पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)उपाययोजना कराकुडाळ येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही केली.