शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

पर्यटन प्रकल्प मोजणी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:34 IST

आचरा : केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत तोंडवळी तळाशील किनाºयावर पर्यटन सुविधा उभारण्याच्या प्रकल्पासाठी किनाºयालगतच्या सर्व्हे नं. ७७ मोजणीचे रोखलेले काम ग्रामस्थांच्या संयमी भूमिकेमुळे पुन्हा सुरू झाले आहे. मालवण तहसीलदार यांनी तोंडवळी सरपंच यांना काढलेल्या नोटिसीनंतर मंगळवारी सर्व्हे नंबर ७७ हद्द निश्चितीचे काम हाती घेण्यात आले.यावेळी तोंडवळी तळाशील ग्रामस्थांनी प्रकल्प ...

आचरा : केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत तोंडवळी तळाशील किनाºयावर पर्यटन सुविधा उभारण्याच्या प्रकल्पासाठी किनाºयालगतच्या सर्व्हे नं. ७७ मोजणीचे रोखलेले काम ग्रामस्थांच्या संयमी भूमिकेमुळे पुन्हा सुरू झाले आहे. मालवण तहसीलदार यांनी तोंडवळी सरपंच यांना काढलेल्या नोटिसीनंतर मंगळवारी सर्व्हे नंबर ७७ हद्द निश्चितीचे काम हाती घेण्यात आले.यावेळी तोंडवळी तळाशील ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकारी दीपक माने यांच्याकडे भूमिका मांडताना आपला प्रकल्पास विरोध नसून वहिवाटीच्या जागा वगळून इतर जागेत प्रकल्प राबविण्यास हरकत नसल्याचे सांगितले, तर माने यांनी आपल्या हरकती विचारात घेतल्या जाऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याने प्रकल्पाची मोजणी ग्रामस्थांच्या संयमी भूमिकेमुळे पुन्हा एकदा चालू झाली.ग्रामस्थांच्या विरोधानंतर मालवण तहसीलदार यांनी तोंडवळी सरपंच यांना नोटीस बजावत २ तारखेला मोजणीच्या कामास पुन्हा सुरुवात केली जाणार असून, सरकारी कामास सहकार्य करण्याचे आवाहन करत मोजणीत अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे कळवले होते.खास ग्रामसभा बोलाविणारपर्यटन प्रकल्पाविषयी भूूमिका मांडताना सरपंच आबा कांदळकर व माजी सरपंच संजय केळुसकर म्हणाले की, आम्ही ग्रामस्थ प्रकल्प विरोधी नसून आम्हा ग्रामस्थांच्या वहिवाटीच्या जागा सोडून इतर उरलेल्या जागेत प्रकल्प राबविण्यास आमचा विरोध नाही. परंतु, कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांच्या समुद्रावर जाण्याच्या पायवाटा, होड्यांची ठेवण्याची ठिकाणे तसेच झोपड्यांच्या जागा मात्र प्रकल्पास देणार नाही. तोंडवळी तळाशील भागात असलेल्या अन्य पडीक जमिनीचा वापर या पर्यटनासाठी शासनाने करावा. पर्यटन प्रकल्पाबाबत योग्य तो ग्रामस्थांचा निर्णय घेण्यासाठी खास ग्रामसभा बोलावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.