शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत ११ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव; रसिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

By सुधीर राणे | Updated: December 11, 2023 14:03 IST

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांच्यावतीने ११ ते १४ जानेवारी या कालावधीत 'कणकवली पर्यटन महोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात ...

कणकवली: कणकवली नगरपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांच्यावतीने ११ ते १४ जानेवारी या कालावधीत 'कणकवली पर्यटन महोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने फूड फेस्टिव्हल तसेच विविध कार्यक्रमांची महापर्वणीच रसिकांना लाभणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, संजय कामतेकर, अभिजित मुसळे, मेघा गांगण, अजय गांगण आदी उपस्थित होते.नलावडे म्हणाले, सध्या नगरपंचायतमध्ये प्रशासक असल्याने नगरपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव आयोजित केलेला नाही. पण स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवकानी दरवर्षीप्रमाणेच पर्यटन महोत्सव घेण्याचे ठरविले. त्याअंतर्गत ११ जानेवारी रोजी  शहरातून भव्य  शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर  सायंकाळी 'बेधुंद ऑर्केस्ट्रा' होईल. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी १२ जानेवारी रोजी २०० स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जानेवारीला शेवटच्या दिवशी हिंदी चित्रपट सृष्टीतील 'सेलिब्रेटी' कलाकार व ख्यातनाम गायक  कणकवलीत हजेरी लावणार आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली