शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक, विद्यार्थ्यांचा ओढा कॉम्प्युटरकडे

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 6, 2024 19:01 IST

सिंधुदुर्ग : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळण्याची संधी असते. नोकरी मिळाली नाही तरी रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना ...

सिंधुदुर्ग : पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळण्याची संधी असते. नोकरी मिळाली नाही तरी रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना असतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी आता पॉलिटेक्निककडे वळत आहेत. जिल्ह्यात एक शासकीय आणि दोन खासगी अशा तीन पॉलिटेक्निक महाविद्यालयात एकुण ७२० जागा आहेत. झटपट नोकरीसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांचा ओढा कॉम्प्युटरकडे आहे. मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ३२० जागा असून अनेक विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास इच्छूक आहेत. ओरोस येथील एमआयटीएम कॉलेजला ९० आणि सावंतवाडी येथील भोसले पॉलिटेक्निकला ३१० जागा आहेत.यावर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला गती आली आहे. जिल्ह्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची सुविधा असलेले शासकीय १ आणि खासगी २ कॉलेज आहेत. शासकीय नोकरीच्या संधी कमी होत असल्याने तसेच शासकीय नोकरीसाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे शिकल्यानंतर रोजगार मिळावा, यासाठी विद्यार्थी आता पॉलिटेक्निककडे वळले आहेत. विशेष म्हणजे, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी पॉलिटेक्निक केलेले विद्यार्थी विविध कंपन्या तसेच इतरही क्षेत्रात कार्यरत आहेत. झटपट नोकरी मिळावी यासाठी विद्यार्थी कॉम्प्युटरला अधिक पसंती देत आहेत.

७२० जागांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी केले अर्जजिल्ह्यात दोन खासगी आणि १ शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आहे. शासकीय कॉलेजमध्ये ३२० जागा आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांचा ओढा शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा असतो.

९ जुलैपर्यंत करता येणार अर्जपॉलिटेक्निकसाठी ९ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. शासकीय कॉलेजला विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. विशेष म्हणजे ११ जुलैला तात्पुरती मेरीट लिस्ट लागणार आहे. १२ ते १४ जुलैदरम्यान, अर्ज भरताना त्रुटी राहिल्यास, कागदपत्रांची दुरूस्ती करता येणार आहे. १६ जुलैला अंतिम लिस्ट लागणार आहे.

विद्यार्थ्यांचा ओढा कॉम्प्युटरकडेपॉलिटेक्निकनंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी असतात. मात्र, कॉम्प्युटरकडे सध्या अधिकाधिक विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यानंतर सिव्हिल तसेच अन्य शाखांना प्राधान्य दिले जाते.

नोकरी, रोजगाराच्या अनेक संधीपॉलिटेक्निक केल्यानंतर शासकीय व खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पॉलिटेक्निककडे वाढला आहे. अनेकांचा कॉम्प्युटरकडे ओढा आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. १६ जुलैला अंतिम यादी लागणार आहे. - डॉ. सुरेश पाटील, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, मालवण

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग