शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीची गोळी स्वतःवर झाडून संपवले जीवन, कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूणाने घेतला टोकाचा निर्णय

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 28, 2023 19:25 IST

बंदुकीच्या चापास नायलॉन दोरी बांधून ती पायाच्या अंगठ्यास अडकवली, अन् जबड्यात गोळी झाडून घेतली

मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर ( ३८, रा. डिकवल बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. याबाबतची तक्रार त्यांच्या भावाने पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन डिकवलकर हे मुंबई येथे पत्नी व मोठ्या मुलासह वास्तव्यास होते. त्यांचा लहान मुलगा डिकवल येथे मूळ घरी राहत होता. ते मुंबईहून आपल्या लहान मुलाला नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिकवल येथे आले होते.कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले होते. त्यांच्या मेहुणीने त्यांच्यासाठी व पत्नीसाठी मुंबई येथे काम पाहिले होते. शुक्रवारी रात्री सचिन यांनी मेहुणीला फोन करत कर्जबाजारी झाल्याने मी जिवाचे बरेवाईट करून घेणार असून तुला काही वेळात त्याची माहिती मिळेल, असे सांगितले. यात तत्काळ त्यांच्या मेहुणीने नातेवाइकांना माहिती देत घरी जाण्यास सांगितले.या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव, कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे प्रकाश मोरे, सिद्धू चिपकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. या घटनेची माहिती सचिन यांच्या भावाने पोलिस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव करत आहेत.

जबड्याला बंदूक लावून गोळी झाडलीशुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान सचिन यांची आई व मुलगा घरात टीव्ही बघत होते तर वहिनी जेवण बनवित असताना सचिन यांनी अंगणात ठासणीच्या बंदुकीच्या चापास नायलॉन दोरी बांधून ती पायाच्या अंगठ्यास अडकवली व बंदूक जबड्यास लावत गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने घरातील मंडळींनी बाहेर धाव घेतली असता सचिन हे खाली पडलेले दिसून आले. या प्रकाराची माहिती गावातील लोकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी