शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:51 IST

संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.

ठळक मुद्देतिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारास्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी घेतला आक्रमक पवित्रा

दोडामार्ग : संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या तिलारीच्या पाण्यावर गोव्याची तहान भागविली जाते. मात्र, ज्यांच्या त्यागावर हे धरण उभे आहे, त्या शिरंगे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या खानयाळे पुनर्वसन गावठणातील (बोडण) धरणग्रस्तांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. भीषण पाणीटंचाईला इथल्या ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी धरणग्रस्तांमधून केली जात होती. मात्र प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली.परिणामी महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे, बोडण सरपंच मनीषा नाईक, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, तालुका उपाध्यक्ष संतोष नाईक, एकनाथ नाडकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती मनीषा देवी आदी उपस्थित होत्या.यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांना नानचे यांनी राज्य सरकारने पाणीटंचाईच्या कामाला मुदतवाढ मिळाली असून, तालुका पातळीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याची बाब लक्षात आणून दिली. तसेच टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली. तर धरणग्रस्तांना शासनाने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.छायाचित्रास प्रतिबंधयावेळी तहसीलदार यांना शिरंगे धरणग्रस्त व बोडण ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासंबंधित मागणी करणारे निवेदन दिले. मात्र, त्याचे छायाचित्र घेण्यास पत्रकारांना तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिबंध केला. आचारसंहितेचे कारण यावेळी त्यांनी पुढे केले.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग