शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघिणीचे दर्शन, वनविभागाकडूनही दुजोरा -video

By अनंत खं.जाधव | Updated: April 7, 2025 16:58 IST

सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आंबोली या सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व स्पष्टपणे दिसून येत आहे. मध्यंतरी ...

सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आंबोली या सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व स्पष्टपणे दिसून येत आहे. मध्यंतरी दाभिल येथील पांडवकालीन जलकुंडात एका वाघीणीचा मृतदेह आढळून आला असतानाच एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. दोडामार्ग परिसरात जंगलप्रेमीना दोन दिवसापूर्वीच वाघिण दिसून आली.

रस्ता ओलांडताना ही वाघिण अचानक गाडी समोर आली आणि थेट जंगलक्षेत्रात स्थिरावल्याचे या पर्यावरण प्रेमींनी सांगितले. या वाघिणीचे पर्यावरण प्रेमीनी केलेले चित्रीकरण व्हायरल होत असून उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी ही हा व्हायरल व्हिडिओ दोडामार्ग तालुक्यातील असल्याचे स्पष्ट केले आहे.मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आंबोली ह्या सह्याद्रीच्या पट्यात वाघांचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागले आहे. या परिसरात वाघांची संख्या वाढली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी चारवर असलेली वाघांची संख्या ही आता आठवर जाऊन पोहोचली आहे. एक वर्षांपूर्वी खडपडे येथील जंगल क्षेत्रात काही ग्रामस्थांना एक वाघीण पाण्यासाठी नदी क्षेत्रात आली असल्याचे दिसून आले होते. त्याचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.वन विभागाने खडपडेतील वाघिण दिसलेले क्षेत्र संरक्षित ही केले होते. काही दिवसापुर्वी दाभिल येथील पांडवकालीन जलकुंडात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच वेळी या परिसरात वाघिणीच्या डरकाळीचा आवाज स्थानिक ग्रामस्थांना तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ऐकू येत होता. याच वाघिणीचे भ्रमण आंबोली परिसरात सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते.त्यातच दोन दिवसापूर्वी मालवण येथील दर्शन वेंगुर्लेकर यांची यूथ बीटसची टीम नेहमी प्रमाणे पशू पक्षी प्राणी न्याहाळण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील जंगलक्षेत्रात आली होती. ही टीम दिवसभर भ्रमण करून मालवणच्या परतीच्या प्रवासात त्यांना दोडामार्ग तालुक्यातील घनदाट जंगलात त्याच्या गाडीसमोरून वाघ रस्ता ओलांडताना दिसला. सुरूवातीला काही समजले नाही पण नंतर हा वाघच असल्याचे त्यांना कळाले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे ते व्हिडिओ व्हायरल होत आहे.

याबाबत उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांना विचारले असता हे क्षेत्र आपल्याच दोडामार्ग तालुक्यातील असून या भागात वाघिणीचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही पूर्वी पासून या भागात विशेष खबरदारी घेत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघforestजंगलforest departmentवनविभाग