शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ओसरगाव येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी तिघांना अटक, ४८ लाखाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 16:56 IST

कणकवली: कणकवली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओसरगाव येथे अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली. यात ४८ लाख ...

कणकवली: कणकवली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओसरगाव येथे अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली. यात ४८ लाख २३ हजार ८९४ रूपये किंमतीची दारू तर १६ लाखाच्या टेंपोंसह एकूण ६४ लाख २३ हजार ८९४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, तिघांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी संशयित रवी चंद्रकांत जाधव (२८), नरेंद्र रामसेवक गुप्ता (३२, दोन्ही रा. ठाणे) आणि सिध्दार्थ मधुकर घोडगे (३५, रा.दहिसर मुंबई) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले असता २३ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.दोन टेंपो गोवा ते मुंबईच्या दिशेने अवैध गोवा बनावट दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई - गोवा महामार्गावर ओसरगाव विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. दोन संशयास्पद टेंपो थांबवून तपासणी केली असता दिशाभूल करण्यासाठी मैद्याची पोती लावून आतमध्ये गोवा बनावट दारू आढळून आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सिंधुदुर्गचे अधीक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी कणकवलीचे निरीक्षक पी.जी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक दळवी, पुजारी, दुय्यम निरीक्षक जी. सी. जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुवसेकर, जवान आणि वाहनचालक रणजित शिंदे, शिवशंकर मुपडे, जंगम यांच्या पथकाने ही कारवाई केली.अटक केलेल्या संशयित तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले असता २३ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याकामी मदतनीस म्हणून शहा व खान यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास कणकवलीचे निरीक्षक पी.जी. सावंत करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी