शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

नियम मोडणाऱ्यांचे ‘वाजले की बारा...’!

By admin | Updated: November 28, 2014 23:52 IST

वाहतूक नियंत्रण : दहा महिन्यात वाहतूक नियंत्रण पोलिसांनी वसूल केला १२ लाखांचा दंड

प्रकाश वराडकर -रत्नागिरी -काही खास लोकांसाठी वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे, दुचाकीवरून तीन सीट घेऊन प्रवास करणे, सिग्नलचे उल्लंघन करणे व भरधाव वेगाने वाहने चालविणे हे जणू भूषण ठरत आहे. या चार गोष्टींचे ‘चार चॉँद’ लावले गेल्यानेच त्यांचे ‘वाजले की बारा...’ अशी स्थिती झाली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या १६ पराक्रमांसाठी (?) पोलिसांच्या जिल्हा वाहतूक शाखेने या भूषणवीरांकडून जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ लाख ९२ हजार ५५० रुपये दंड वसूल केला आहे. रत्नागिरी वाहतूक पोलीस शाखेने गेल्या दहा महिन्यांच्या काळात वाहतूक नियमनासाठी ज्या मोहिमा राबविल्या व नियमित स्वरुपात वाहनांची जी तपासणी केली त्यामध्ये वाहनचालकांकडून १६ प्रकारच्या नियमभंगासाठी दंड वसूल केला आहे. ही १६ विविध कारणे असली तरी त्यातील भरधाव वेगाने (धूम स्टाईल) गाडी हाकणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात घेणे यासारख्या मुख्य कारणांमुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अवैध प्रवासी वाहतूक, रहदारीस अडथळा, कागदपत्र जवळ नसणे, चालक परवाना नसणे, रहदारीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, दुचाकीवर तिघांनी बसून प्रवास करणे, वाहन भरधाव चालविणे, वाहनात, रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, नो पार्किंगमध्ये वाहन ठेवणे, वाहनांवर नंबर प्लेट नसणे, सिग्नल तोडणे, गणवेश नसणे यासारख्या १६ कारणांसाठी वाहतूक पोलिसांनी जिल्हाभरात दहा महिन्यात ९८६४ जणांना दंड ठोठावला.वाहनांची संख्या वाढत असताना वयाची १८वर्षे पूर्ण न केलेल्या मुलांनाही पालक दुचाकी घेऊन देतात. त्यांना परवाना मिळू शकत नाही. त्यातील अनेक मुले विनापरवाना गाडी चालवितात. (प्रतिनिधी)आॅक्टोबर २०१४अखेरची कारवाईअ.नं.प्रकार एकूणकेसेसतडजोड शुल्क/दंड१अवैध प्रवासी वाहतूक७८१,०५,०५०२रहदारीस अडथळा९६६१,००,७००३कागदपत्र जवळ न बाळगणे१,०३९१,०९,३००४लायसन जवळ न बाळगणे१,००५१,०६,७००५रहदारीचे विरुद्ध९९४१,०२,५००६दुचाकीवर तीन सिट१,१५३१,१३,१००७फ्रन्ट सीट२३५२४,७००८भरधाव वेगाने वाहन चालविणे६६२८,०५०९क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी५५६,२००१०वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे५१७५२,७००११नो पार्किं गमध्ये वाहन चालविणे३८४,०००१२फाळक्याचे बाहेर माल२७४२७,८००१३वाहनावर नंबर प्लेट नसणे४५१४५,७००१४सिग्नलचे उल्लंघन करणे१,६१०१,६७,३००१५गणवेश परिधान न करणे३१३,३००१६इतर केसेस१,३५२१,९५,४५०एकूण केसेस९,८६४११,९२,५५०वाहन चालविताना मोबाईल धोकादायकशहरात दुचाकी चालविताना एका हातात कानाला लावलेला मोबाईल व दुसऱ्या हाताने दुचाकी चालविणे असे प्रकार वाढले आहेत. हाच प्रकार चारचाकी चालविणाऱ्यांबाबतही सुरू आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रतिष्ठित म्हणविणाऱ्यांकडूनच याप्रकारे नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण जास्त आहे. पोलिसांनी अडविलेच तर दंड भरण्यास ते जराही मागेपुढे पाहत नाही. त्यांच्यासाठी वाहतूक नियम मोडणे हेच जणू प्रतिष्ठेचे बनले आहे की काय, असा संशय घेण्याजोगी स्थिती आहे. त्यामुळे अशा प्रतिष्ठितांनाही वाहतूक कायद्याचा बडगा हा दाखविलाच पाहिजे. वेगाचे फॅड जीवघेणे...अलिकडे तरुणाईत वेगाचे वारे भलतेच भरले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या स्पोर्टस दुचाकी अशा काही वेगाने पळतात की धूम स्टाईलही फिकी पडावी. त्यांना केवळ वेगाची फिकीर असते. रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांच्या जिविताची फिकिर नसते. आपल्या वेगामुळे दुसऱ्याचे आयुष्य, जीव धोक्यात येईल. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबिय पोरके होतील हे त्यांच्या गावीही नसते. त्यामुळे हे वेगाचे वारे रोखण्यासाठी, वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे..