शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गाळ्यांचे भंगार २२ हजारांना विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:26 IST

वेंगुर्ले नगरपरिषद बैठक : नगरसेवकांकडून नगराध्यक्ष धारेवर

वेंगुर्ले : वेंगुर्ले मच्छिमार्केटसाठी तोडण्यात आलेल्या त्या गाळ्यांचे लाखमोलाचे भंगार सामान फक्त २२ हजार रुपयांना विकण्यात आल्याने गुरूवारच्या मासिक सभेत नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. तर भंगारात दिलेले सामान घेऊन त्याचा परत लिलाव करण्यात यावा, असा ठराव करण्यात आला.

वेंगुर्ले नगरपरिषदेची सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायी सभेत झालेले निर्णय हे मासिक बैठकीसमोर ठेवणे बंधनकारक असताना गुरूवारच्या सभेत स्थायी समिती इतिवृताचे वाचन हा विषय का ठेवण्यात आला नाही, असा प्रश्न नगरसेवक तुषार सापळे यांनी उपस्थित केला. त्यावर विधाता सावंत, शीतल आंगचेकर, संदेश निकम, आत्माराम सोकटे, शैलेश गावडे, प्रकाश डिचोलकर यांनी या  विषयाला दुजोरा दिला व प्रशासनास स्थायी समितीमधील विषय वाचून दाखवण्यास भाग पाडले व त्या २५ विषयांवर  चर्चा करण्यात आली. तर अद्ययावत मच्छिमार्केटसाठी त्या तोडण्यात आलेल्या गाळ्यांचे सामान फक्त २२ हजार किंमतीत विकल्याने हे भंगार परत घेऊन त्याचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली व तसा ठराव घेण्यात आला. तर उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी राऊळवाडा येथील कॉम्प्लेक्समधील सांडपाणी येथील बागेमध्ये सोडण्यात येते. याविषयी वारंवार तक्रार करूनही त्या कॉम्प्लेक्सवर कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत या प्रश्नी तत्काळ उपाययोजना करण्याची  मागणी केली.

हॉस्पिटल नाका येथील  सध्या बंद स्थितीत असलेले सेंट लुक्स हॉस्पिटल पुनर्जीवित करण्यात यावे या संदर्भात नगराध्यक्ष यांना कळविण्यात आले असता हे हॉस्पिटल राज्य शासनाने आपल्या ताब्यात घेऊन ते  वेंगुर्ले नगरपरिषदेकडे चालविण्यास द्यावे व त्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य राज्य शासनाने करावे, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला. 

गळकी गाडी आढळल्यास कारवाई करानगरसेविका शितल आंगचेकर यांनी नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवर मासे वाहतूक करणाऱ्या गाड्यांतून पडणाऱ्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. अशा गळक्या गाड्यांतून मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकारी यांनी मासे वाहतूक करणारी अशी गळकी गाडी आढळल्यास त्यावर त्वरीत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशन