शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या १५ व्या वर्षापासून बाबल्या करतोय  चोऱ्या,  तीन चोऱ्यांची दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:36 IST

कलमठ-गुरववाडी येथील चोरीप्रकरणी संशयित शत्रुघ्न उर्फ बाबल्या नाईक याला पणदूर तिठा येथे कणकवली पोलिसांनी सापळा रचून अटक केल्यानंतर त्याने केलेल्या आणखी तीन चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. सावंतवाडी, ओरोस, कणकवली, रत्नागिरी येथे बाबल्याने चोऱ्या केल्या आहेत. बाबल्या वयाच्या १५ व्या वर्षापासून चोऱ्या करीत आहे.

ठळक मुद्देवयाच्या १५ व्या वर्षापासून बाबल्या करतोय चोऱ्यातीन चोऱ्यांची दिली कबुली

सिंधुदुर्ग : कलमठ-गुरववाडी येथील चोरीप्रकरणी संशयित शत्रुघ्न उर्फ बाबल्या नाईक याला पणदूर तिठा येथे कणकवली पोलिसांनी सापळा रचून अटक केल्यानंतर त्याने केलेल्या आणखी तीन चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. सावंतवाडी, ओरोस, कणकवली, रत्नागिरी येथे बाबल्याने चोऱ्या केल्या आहेत. बाबल्या वयाच्या १५ व्या वर्षापासून चोऱ्या करीत आहे.चोरीला सुरुवात केली त्यावेळी तो अल्पवयीन होता. आता मात्र तो सज्ञान झाला आहे. बाबल्याला अटक करण्याची कारवाई सोमवारी सायंकाळी केली होती. शत्रुघ्न उर्फ बाबल्या नाईक (१९, रा. मांडकुली, ता. कुडाळ) याने कलमठ-गुरववाडी येथे १९ ते २६ जून या कालावधीत रविभूषण लाड यांच्या घरात भाड्याने राहणारा संदीप जाधव याने घरासमोरर् ंउभी करून ठेवलेली दुचाकी चोरली. याबाबत जाधव याने २६ जून रोजी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.नाईक याला चोरीप्रकरणी अटक झाल्यानंतर तो डिसेंबरमध्ये जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने ३० जानेवारी २०१८ रोजी कुडाळ येथे घरफोडी केली होती. तत्पूर्वी रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली-लक्ष्मीनारायण वाडी येथील अमोल रामचंद्र घडशी यांची २४ जानेवारी रोजी पहाटे ५.१५ ते ५.३५ या कालावधीत दुचाकी चोरली.

अमोल घडशी यांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आपली दुचाकी लावून ठेवली होती. अमोल घडशी रेल्वे स्थानकावर गेल्याची संधी साधून बाबल्या नाईक याने त्यांची गाडी लंपास केली होती. ही गाडी ओसरगाव येथे बोर्डवे रस्त्यावर आणून ठेवली होती. रस्त्याच्या कडेला जंगलमय भागात बाबल्या गाड्या लपवून ठेवत असे

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्ग