शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातून येणाऱ्या नागरिकांचे महाराष्ट्र सीमेवर थर्मल स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:17 IST

CoronaVIrus Sindhudurg : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यासाठी बुधवारी सकाळपासून महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे महसूल, पोलीस, प्रशासनाकडून तपासणी सुरू करण्यात आली. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रवासी नागरिकांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी केल्यानंतर प्रवेश देण्यात येत आहे. तपासणी नाक्यावर प्रवाशांची वा वाहनाची कोणतीही अडवणूक न करता फक्त प्रवाशांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी, नाव, पत्ता, मोबाइल नंबर नोंदवहीत लिहिण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देगोव्यातून येणाऱ्या नागरिकांचे महाराष्ट्र सीमेवर थर्मल स्कॅनिंगकोणतीही अडवणूक नाही : बांदा येथे तपासणी सुरू

बांदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यासाठी बुधवारी सकाळपासून महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे महसूल, पोलीस, प्रशासनाकडून तपासणी सुरू करण्यात आली. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या प्रवासी नागरिकांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी केल्यानंतर प्रवेश देण्यात येत आहे. तपासणी नाक्यावर प्रवाशांची वा वाहनाची कोणतीही अडवणूक न करता फक्त प्रवाशांची थर्मल गन स्कॅनिंग चाचणी, नाव, पत्ता, मोबाइल नंबर नोंदवहीत लिहिण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.या कामासाठी चार प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केली आहे. थर्मल गन वापरण्यासाठी एक आरोग्य सेवकही तपासणी नाक्यावर कार्यरत आहे. वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी नाक्यावर अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू करणे गरजेचे होते. पण सीमा तपासणी नाक्यावर अँटिजेन रॅपिड टेस्ट करताना कोणतेही पथक दिसून आले नाही.

याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाला अशी साधी तपासणी करून काय सिद्ध करायचे आहे हे कळणे अवघड आहे. शासनाने गोव्यासह इतर सहा राज्ये ही प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत. त्यामुळे सीमेवर बांदा-सटमटवाडी तपासणी नाक्यावर महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे थर्मल स्कँनिग पथक तैनात आहे. सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांनी पाहणी केली.

महाराष्ट्र हद्दीतून गोवा सीमेवर जाणाऱ्या प्रवाशांना मुभा, तर गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल गन स्कँनिग चाचणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र व गोवा सीमा बंद केलेली नाही.- राजाराम म्हात्रे,तहसीलदार, सावंतवाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbanda-pcबांदाsindhudurgसिंधुदुर्ग