शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:12 IST

रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही.स्थानिकांना तो नको असल्याने नाणार येथून तो हटवला आहे.महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्‍चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल.तसेच आडाळी येथे पुढील कालावधीत गोव्यातील उद्योग येणार आहेत.त्याबाबत जागेचीही निश्‍चिती झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देजेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई आडाळी एमआयडीसीमध्ये गोव्यातील उद्योग येणार

कणकवली : रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही.स्थानिकांना तो नको असल्याने नाणार येथून तो हटवला आहे.महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्‍चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल.तसेच आडाळी येथे पुढील कालावधीत गोव्यातील उद्योग येणार आहेत.त्याबाबत जागेचीही निश्‍चिती झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.येथील विजय भवन येथे शिवसेना पदाधिकार्‍यांनी महत्वाची बैठक झाली.यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.देसाई म्हणाले,नाणार परिसरातील नागरिकांना नाणार प्रकल्प नको असल्याने तो रद्द केला.सध्या तेथे प्रकल्पासाठी जागा देण्याबाबत हमीपत्रे लिहून घेतली जात आहेत.पण प्रकल्पच रद्द झाल्याने या हमीपत्रांचा उपयोग नाही.आम्ही रिफायनरी प्रकल्पा विरोधात नाही जर महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथे हा प्रकल्प होण्यास आमची कोणतीही हरकत नसेल.आडाळी येथे उद्योग येण्याबाबत आम्ही नुकतीच गोव्यातील उद्योजकांची भेट घेतली.गोव्यात उद्योग उभारण्यासाठी जागाच उपलब्ध नाही त्यामुळे तेथील उद्योजक आडाळी येथे येणार आहेत.या उद्योजकांना लागणार्‍या जागेचीही निश्‍चिती आडाळी येथे करण्यात आली असल्याचे देसाई म्हणाले.सिंधुदुर्ग रत्नागिरी भाजप व इतर काही युतीमधील पक्ष नाराज असले तरी त्यांची समजूत काढण्याचे काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसांत शिवसेनेसोबत भाजप,आरपीआय आदींचेही झेंडे आणि पदाधिकारी प्रचारामध्ये सक्रीय झालेले दिसतील असेही .देसाई म्हणाले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पSubhash Desaiसुभाष देसाईsindhudurgसिंधुदुर्ग