शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Ganpati Festival -गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार ११ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:44 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी दिली. यावेळी सहाय्यक वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देपरिवहन महामंडळातर्फे खास नियोजन रत्नागिरी विभागाकडून प्रवाशांसाठी ९५ जादा गाड्या

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी  दिली. यावेळी सहाय्यक वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव आदी उपस्थित होते.२९ आॅगस्ट रोजी ५२, ३० रोजी ३७४, ३१ रोजी १४८५, तर १ सप्टेंबर रोजी २७९ जादा गाड्या मुंबईतून सुटणार आहेत.सर्वाधिक गाड्या ३१ रोजी सुटणार आहेत. रत्नागिरी विभागाकडून प्रवाशांसाठी ९५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत मुंबई मार्गावर या गाड्या धावणार आहेत.गणेशोत्सवासाठी कशेडी, चिपळूण शिवाजीनगर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून, चिपळुणात क्रेन उपलब्ध ठेवली जाणार आहे. अद्ययावत तीन दुरूस्ती व्हॅन खेड, चिपळूण, रत्नागिरी, ते राजापूर मार्गावर २४ तास तैनात राहणार आहे. याशिवाय महामार्गावरील प्रत्येक आगाराच्या कार्यशाळेत कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. रत्नागिरीत कंट्रोल रूम कार्यान्वित असणार आहे. याशिवाय कशेडी ते खारेपाटणपर्यंत दोन गस्तीपथके २४ तास कार्यरत राहणार आहेत.याशिवाय प्रत्येक आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, शालेय फेऱ्यादेखील सुटीतही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय रेल्वेस्थानकांतूनही प्रवाशांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती, प्रभारी वाहतूक नियंत्रक बोगरे यांनी दिली.नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा गाड्यायावर्षी मुंबई उपनगरातून कोकणात गणेशोत्सवासाठी नियमित बसेस व्यतिरिक्त कोकणात २२०० जादा गाड्या सोडण्यात येणार असल्या तरीनियमित गाड्यांबरोबर परतीच्या प्रवासासाठी १२७१ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ग्रुप बुकिंगच्या १२३ गाड्या आहेत. ३४१ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ८ सप्टेंबर रोजी ४८७, ९ रोजी ३१०, १० रोजी १९५, ११ रोजी ६५, १२ रोजी ५९, ७ रोजी १५५ गाड्या धावणार आहेत. गतवर्षी १३६६ गाड्या मुंबई मार्गावर सोडण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग