शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्ष असावेत : राज ठाकरे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 3:43 PM

मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून हिंदूंची मते काही बदलणार नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्षांची सत्ता असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत त्यांनी यावेळी मौन पाळले.

ठळक मुद्देराज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्ष असावेत : राज ठाकरे यांचे मतमोदीमुक्त भारत झालाच पाहिजेप्रलंबित प्रश्नांसाठी कोकणी जनतेने हिसका दाखवावा

सिंधुदुर्ग : मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून हिंदूंची मते काही बदलणार नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्षांची सत्ता असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत त्यांनी यावेळी मौन पाळले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मंगळवारपासून नियोजित कोकण दौरा सुरू झाला आहे. त्यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ््या विषयांवर रोखठोक मते मांडली. कोकणी जनतेने हिसका दाखविला तरच येथील प्रलंबित प्रश्न सुटतील, असेही त्यांनी सांगितले.यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसेचे कोकण नेते शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया मेहता, बाबल गावडे, दीपक गावडे, राजू टंगसाळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या ठाकरे शैलीत राज यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ््या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना या ठिकाणी अपघात होऊन पाच जणांचे बळी गेले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र याकडे महामार्ग प्रशासन व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत आहे. यावर ठाकरे म्हणाले की, जर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रहात असते तर येथील महामार्गाचे काम लवकर झाले असते.बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा महामार्ग यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. सहा ते सात वर्षे हे काम सुरू आहे, त्याचे काय? कोकणी जनतेने हिसका दाखविला पाहिजे. तो दाखविला जात नसल्यानेच येथील प्रश्न प्रलंबित आहेत, असे त्यांनी सांगितले.पालघर येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी येत आहेत, या प्रश्नावर आदित्यनाथांच्या कुठेही जाण्याने काहीही फरक पडत नाही. हिंदू मतांचा काय संबंध? योगी हिंदू मते फिरवू शकतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या सत्ता स्थापनेवर राज म्हणाले की, केंद्र्रात काहीही होऊ दे, पण राज्यात प्रादेशिक पक्षच हवा. कारण प्रादेशिक पक्षांनाच राज्याच्या अस्मितेची आणि येथील प्रश्नांची जाण असते. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय पक्षांना स्थान मिळता कामा नये. सिद्धरामय्यांनी कर्नाटकात जे करून दाखविले ती हिंमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का दाखवित नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.प्रादेशिक पक्षाचा महाराष्ट्रात विचार झाला असता, तर नाणारमध्ये परप्रांतीयांच्या जमिनी घेण्याची हिंमत झाली नसती. मनसेचे सरकार असते तर अशी हिंमत परप्रांतीयांनी केली असती का, असा सवालही त्यांनी केला.मोदींची लाट ओसरली असे वाटते का? असा थेट सवाल ठाकरे यांना केला असता ते म्हणाले, मोदीमुक्त भारत हवाच. गुजरातमधील निकालावरून मोदींची लाट ओसरली असे वाटते. माझा त्या ई.व्ही.एम. मशीनवर संशय आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही या मशीनबाबत संशय होता, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे