शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

..तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती, वैभव नाईकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:54 IST

'तेव्हा त्यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कशी टीका करत होते हे जनतेला माहीत आहे'

कणकवली : नारायण राणे आज ज्या भाजप पक्षात आहेत, तो पक्ष घडविण्याचे काम प्रमोद महाजन यांनी केले होते. त्याच प्रमोद महाजन यांचे प्रकाश महाजन हे ज्येष्ठ बंधू आहेत, एवढे भान ठेवले असते तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती, अशी टीका करतानाच राणे व त्यांच्या चिरंजीवांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत, याची जाणिव ठेवावी अशी प्रतिक्रिया उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे.मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर खासदार नारायण राणे यांनी टीका केली होती. त्याबाबत वैभव नाईक यांनी एका व्हिडिओद्वारे  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे की, नारायण राणे यांना आपल्या मुलावर प्रकाश महाजन यांच्यासारख्या वयस्कर नेत्याने केलेली टीका झोंबली आहे.

नारायण राणे, नितेश राणे हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, यात दुमत नाही. पण, राणेंनी निवडून येण्यासाठी किती पक्ष बदलले? नारायण राणे ज्या ज्या पक्षात होते त्या - त्या पक्षांवर त्यांच्या चिरंजीवाने वेळोवेळी कशी टीका केली आहे, हे देखील राणेंनी स्वतः बघावे. याच राणेंना काँग्रेस प्रवेशानंतर सोनिया गांधी यांनी राज्यात मंत्री करतानाच त्यांच्या मुलाला खासदारही केले होते. तरीही राणेंचे चिरंजीव वयाचे भान न ठेवता सोनिया गांधी यांच्यावर टीका करत असतात. अगदी ज्या बाळासाहेबांनी राणेंना घडवले त्यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यावरही राणेंचे चिरंजीव टिका करत असतात. तर हेच राणे काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कशी टीका करत होते, हे जनतेला माहीत आहे. मग, त्यावेळी राणेंना आपल्या चिरंजीवांची प्रगल्भता दिसली नव्हती का? असेही नाईक म्हणाले.राणेंचे चिरंजीव कुणाही ज्येष्ठ नेत्यांवर टीका करतात. पण, त्यांच्यावर टीका होते, त्यावेळी आपण जनतेमधून निवडून आल्याचे राणे सांगतात. कुणी टीका केली की मारण्याची धमकी द्यायची, हे योग्य नव्हे. राणे व त्यांच्या चिरंजीवांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत, याची जाणिव ठेवावी, असेही नाईक यांनी म्हटले आहे.