शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मोती तलावातील पाणी सोडले, मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:09 IST

तलावातील संरक्षक भिंत बांधण्यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत झाला आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

सावंतवाडी : शहरातील सावंतवाडी-बांदा महामार्गाच्या बाजूने मोती तलावाच्या दोन संरक्षक भिंतींचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. सुमारे ७० लाखाची ही दोन कामे आहेत. सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्या बाजूला १५ मीटर तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १६ मीटर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.तर तलावातील संरक्षक भिंत बांधण्यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत झाला आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

सावंतवाडी शहरात मोती तलावातील गाळ काढण्यासाठी गतवर्षी डोजर लावण्यात आला होता. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयाजवळील मोती तलावाची संरक्षक भिंत कोसळली होती. ही भिंत एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्या बाजूला मोती तलावाची संरक्षक भिंत ढासळत होती. हीच परिस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील भिंतीबाबत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे ठरविले. त्यानुसार १५ आणि १६ मीटर अशा दोन ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात येत आहेत. त्यासाठी ७० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. रविवारपासून संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. 

जेसीबी लावून त्यासाठी रस्ता तलावात करण्यात येत आहे. दोन्ही संरक्षक भिंती झाल्यानंतर तलावाकाठच्या संरक्षक भिंती मजबूत होतील. परंतु वारंवार तोडफोड होत असल्यामुळे मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे.तर दुसरी कडे  गाळ काढण्यासाठी आणलेला डोजर दोन दिवस उभा आहे. या डोजरने मार्ग बनविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु मार्ग बनविणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे डोजर उभा आहे. यातून आता गाळ काढण्याचे काम यंदा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चार दिवसानंतर ही तलावात आता डोजर उतरण्याचेच काम करण्यात येत आहे.

पाणी सोडल्याने मासे मृत परिसरात दुर्गंधी बांधकाम करण्यासाठी मोती तलावातील पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे तलावातील मासे मृत पावले असून परिसरात एकच दुर्गंधी पसरली आहे. अनेकानी याबाबत सावंतवाडी नगरपरिषद कडे तक्रारी केल्या आहेत तलावाच्या परिसरातून ये जा करणाऱ्या ना नाकाला रुमाल लावून जावे लागते. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग