शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील बेरोजगारांना सत्ताधारी, लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले - परशुराम उपरकर

By सुधीर राणे | Updated: July 5, 2024 17:49 IST

कणकवली : सिंधुदुर्गातील बेरोजगारांना सत्ताधारी व लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले आहे. सध्या झालेल्या शिक्षक भरतीमध्ये जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगार उमेदवार ...

कणकवली : सिंधुदुर्गातील बेरोजगारांना सत्ताधारी व लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले आहे. सध्या झालेल्या शिक्षक भरतीमध्ये जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगार उमेदवार असतानाही सर्व शिक्षकांची पदे परजिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा पक्षाच्या उमेदवाराने डीएड, बीएड उमेदवारांना तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले होते, मात्र तसे झाले नाही. राज्यकर्ते जर बेरोजगारांना नोकरी देऊ शकत नसतील तर येणाऱ्या निवडणुकीत त्या सर्वांनी राज्यकर्त्यांच्या कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, जिल्ह्यात ५०० शिक्षकांची भरती झाली. त्यामध्ये सर्व शिक्षक हे परजिल्ह्यातील नियुक्त करण्यात आले. शिक्षक भरतीसाठी जिल्ह्यातील सर्व डीएड ,बीएड शिक्षक संघटना आठ जुलैला आंदोलन करणार आहेत. २०१० पासून शिक्षक भरती झालेली नाही. जे डीएड, बीएड झाले आहेत त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना कर्ज काढून शिक्षण दिले आहे. परंतु शासनकर्ते व लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील डीएड, बीएड उमेदवार भरती प्रक्रियेपासून वंचित राहिल्याने काहींची वयोमर्यादा संपली आहे.जिल्ह्याचे सुपुत्र तथा राज्याचे शिक्षण मंत्री यांना डीएड, बीएड उमेदवारांचे विषय समजूनही ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जर शिक्षणमंत्र्यांनी प्रत्येक विभागाची निवड मंडळ तयार केली असती, तर त्या त्या विभागातील बेरोजगार उमेदवारांना न्याय मिळाला असता.  शिक्षक भरती होऊन जिल्ह्यात आलेले बरेच शिक्षक हे विदर्भ- मराठवाडा भागातील असल्याने त्यांची भाषा येथील विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे.  माजी पालकमंत्री व राज्याचे शिक्षण मंत्री हे जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीसाठी निधी आणू शकत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. तसेच ज्यावेळी त्यांच्या तालुक्यातील शाळा पडली त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी ते खाते माझ्याकडे नसल्याचे सांगितले होते. परंतु ती बाब  ग्रामविकास विभागाकडे असली तरीही कॅबिनेट मंत्री शाळा दुरुस्तीसाठी निधी आणू शकतो. ग्रामसेवक भरती किंवा रोजंदारी पद्धतीने नियुक्त केलेले कर्मचारी हे सर्वच परजिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी करायचे काय ? असा प्रश्नही उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर