शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नगराध्यक्षांसह कणकवली नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल उद्या संपणार, समारोपाच्या सभेत सर्वजण झाले भावूक

By सुधीर राणे | Updated: May 4, 2023 16:07 IST

कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट लागणार

कणकवली: कणकवली नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाल ५ मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपंचायतीच्या प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात विशेष सभा झाली. समारोपाच्या या सभेत सर्वच नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षही भावूक झाले. गत आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांना अश्रू अनावर झाले. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत घडलेल्या काही घटना तसेच कटू प्रसंगांबद्दल एकमेकांची माफी मागितली.तसेच दिलगिरीही व्यक्त केली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी मनोगत व्यक्त करताना कणकवलीच्या विकासासाठी जनतेने ठरविले तर नगरपंचायत मध्ये 'मी पुन्हा येईन' असे उदगार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काढले. सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करून जनतेचे प्रश्न सोडवत नगराध्यक्ष पदाला आपण न्याय  देवू शकलो. आजचा आनंदाचा आणि दुःखाचाही दिवस आहे. यापुढे निवडणुका येतील  आणि जातीलही. मात्र, जनसेवा करण्यासाठी आपण यापुढेही तत्पर राहणार आहोत. आता खुर्चीवरून पाय उतार होत असलो तरी पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय राजवट लागणार असून शहराचे काय होईल? याची चिंता वाटते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत  ५० कोटी ६० लाखांचा निधी आम्ही शहरासाठी आणला. राज्यात आमची सत्ता नसतानाही तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला मदत केली. आमदार वैभव नाईक माझे मित्र आहेत त्यांनीही मदत केली.अशी अनेकांची मदत आम्हाला लाभली आहे.कोविड काळात अगदी जीवावर उदार होऊन कणकवलीत विविध उपक्रम राबविले. वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे कणकवली नगरपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक आला. विरोधी नगरसेवकांबरोबर मतभेद होते. पण मनभेद कधीही ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील विकासकामेही केली असेही ते म्हणाले.अबीद नाईक म्हणाले, राजकारणापेक्षा समाजकारण करण्याकडे माझा कल राहिला आहे.  समीर नलावडे यांनी जबरदस्तीने मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीला उभे केले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असतानाच नगरसेवक पदाच्या माध्यमातून जनसेवेला प्राधान्य दिले. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा सावंत, मेघा गांगण, शिशिर परुळेकर, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, अभिजित मुसळे, विराज भोसले, संजय कामतेकर, कन्हैया पारकर, सुशांत नाईक आदी नगरसेवकांनीही मनोगत व्यक्त केले. विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच चांगली कामे!कणकवली नगरपंचायत मध्ये विरोधी नगरसेवकांची जबाबदारी आम्ही पूर्ण क्षमतेने निभावली आहे.विरोधी नगरसेवक स्ट्रॉंग असल्यानेच शहरात चांगली कामे झाली आहेत. मात्र, जुन्या भाजीमार्केट जवळील स्वच्छता गृहासाठी ८६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ते कशासाठी? याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ए.जी.डॉटर्सचा प्रकल्प,शहराचा डीपी प्लॅन याबाबतही पुढे काय झाले?ते जनतेला सत्ताधाऱ्यानी सांगावे.असे यावेळी सुशांत नाईक म्हणाले.तर कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांनी या मुद्द्यांना दुजोरा दिला. 

तुम्ही कायम विरोधकच राहा!शहरात झालेली विकासकामे ही तुम्ही सक्षम विरोधक असल्यानेच चांगली झाली,असे तुमचे म्हणणे आहे. तसे असेल तर पुढील कालावधीतही तुम्ही नगरपंचायतीत विरोधकच राहा.असा टोला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांना लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली