शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
7
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
9
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
10
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
11
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
12
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
13
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
14
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
15
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
16
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
17
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
18
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
19
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
20
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?

Sindhudurg: अखेर मोती तलावातील मगर जेरबंद, पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:02 IST

वनविभागाच्या जलद कृती दलाकडून कामगिरी फत्ते 

सावंतवाडी : मोती तलावातील ऑपरेशन यशस्वी झाले असून बुधवारी सकाळी मगरीला पकडण्यात वनविभागाच्या जलद कृती दलाला यश आले आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.तब्बल दोन वेळा हुलकावणी देणाऱ्या मगरीला वनविभागाकडून सापळ्यात अडकवल्याचे कळताच मोती तालावाच्या काठावर नागरिकांनी गर्दी केली होती. ऑपरेशन मगर यशस्वी झाल्यानंतर कारज्यावरील अडथळा दूर होणार आहे.मगरीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सोमवार पासून मगरीचा माग वनविभागाची टीम काढत होती. मात्र मगर वनविभागाच्या पथकाच्या हाती लागत नव्हती. पिंजरा लावून देखील ती त्यात येत नव्हती. माणसाची चाहूल लागताच ती पळ काढत होती. अखेर आज, बुधवारी जलद कृती दलाच्या टीमच्या सापळ्यात ही पाच फुटी मगर कैद झाली.ऐन गणेशोत्सवात विसर्जनस्थळी संकट निर्माण झाले होते. त्यामुळे मगरीला पकडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेले पाच दिवस ही मगर पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. अखेर या मोहिमेला यश आले.मगरीला वैद्यकीय तपासणीसाठी सातारा येथे नेण्यात आले आहे. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, पथक प्रमुख बबन रेडकर, प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब, राकेश अमृसकर आदी उपस्थित होते.