शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: भुईबावडा घाटात नवीन संरक्षक भिंत कोसळली, रस्त्यालाही भेगा; वाहतूक धोकादायक

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 17, 2024 18:32 IST

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह?

प्रकाश काळेवैभववाडी : भुईबावडा घाटातील संरक्षक भिंत कोसळली असून, रस्त्यालाही मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा घाटमार्गही वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात बांधलेली ही संरक्षक भिंत कोसळल्यामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वाहनचालकांतून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.दुपदरीकरणासह काँक्रिटीकरणासाठी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट तब्बल सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक भुईबावडा घाटातून वळविण्यात आली आहे. परंतु, हा घाटमार्गही आता वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. भुईबावडा घाटातील संरक्षक भिंतीचे बांधकाम यावर्षीच्या उन्हाळ्यात करण्यात आले होते. ही काँक्रीटची नवीन संरक्षक भिंत कोसळली असून, या भिंतीलगत रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ताही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर्षी बांधलेली संरक्षक भिंत पहिल्या पावसाळ्यातच कोसळल्यामुळे कामाचा दर्जा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धती विषयीच साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे. वाहतुकीस बंद असलेल्या करूळ घाटातील संरक्षक भिंतीसह काँक्रीटचा रस्ता वाहून गेलेला असतानाच भुईबावडा घाटातील संरक्षक भिंतही कोसळल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वैभववाडी, तळेरे, देवगड, खारेपाटण परिसरातील शेकडो वाहनचालकांना कोल्हापूरला जाण्या-येण्यासाठी भुईबावडा हा एकमेव सोयीचा मार्ग सुरू आहे. मात्र, याच घाटात पडझड सुरू झाल्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. दरम्यान, बांधकाम विभागाने खचलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी बॅरेल उभी केली आहेत. परंतु त्याच बॅरेलच्या बाजूला रस्त्याला भेगा पडलेल्या ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे अक्षरशः जीव मुठीत धरून भुईबावडा घाटातून प्रवास सुरू आहे.

कोट्यवधींचा खर्च; पण कामांचा दर्जा सुमारच!मागील दोन वर्षांत भुईबावडा घाटात जवळपास २० ते २५ कोटी रुपयांची कामे झाली. त्यामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, बाजूपट्ट्या, संरक्षक भिंती बांधणे, गटारे आदी कामांचा समावेश आहे. परंतु, यातील बहुतांश कामे निकृष्ट झाली असल्याचे या घाटात पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच कोट्यवधींचा निधी खर्च पडूनही भुईबावडा घाटमार्ग असुरक्षितच असल्याची भावना वाहनचालकांमध्ये आहे.

दोन दिवसांपूर्वी भुईबावडा घाटातील संरक्षक भिंत कोसळली आहे. या भिंतीखालील भराव वाहून गेल्यामुळे संरक्षक भिंत कोसळली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. -विनायक जोशी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम, वैभववाडी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक