शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडीतील भराडी देवीचा आजपासून यात्रोत्सव, लाखो भाविक दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:07 IST

प्रशासनाचे नियोजन पूर्ण; नऊ रांगांमधून होणार देवीचे दर्शन

मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि दक्षिण कोकणातील काशी म्हणून प्रसिद्ध मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवार (दि.२२) व रविवारी (दि. २३) साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाने ग्रामस्थांना हाताशी धरत योग्य नियोजन केले आहे. शनिवारी पहाटे ३ वाजल्यापासूनच देवीच्या दर्शनास आणि ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. तब्बल नऊ रांगांमधून देवीचे दर्शन दिले जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंडळाने दिली.भराडी मातेच्या दर्शनासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यांनी पूर्ण केली आहे. यात्रेत आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज ग्रामविकास मंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

कोट्यवधींची उलाढालदेवीच्या चरणी श्रद्धेने, मनोभावे केलेला नवस पूर्ण होतोच होतो. मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून भराडी देवीची महती सर्वदूर पोहोचल्याने एका चाकरमान्यासोबत राज्याच्या विविध भागातील त्याचे मित्र आंगणेवाडीच्या जत्रेत दिसून येतात. दोन दिवसांच्या या यात्रेत कोट्यवधीची उलाढाल होते.

चोख पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्हींची नजरयात्रोत्सव काळात ६ पोलिस उपअधीक्षक यांच्यासह ५१ अधिकारी, ६५० पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड तसेच दोन दंगल नियंत्रक पथक, घातपात विरोधी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ५० सीसीटीव्ही कॅमेरे, दहा व्हिडीओ शूटिंग कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

लाखो चाकरमानी दाखलया यात्रोत्सवासाठी मुंबई येथून लाखो चाकरमानी दाखल होतात. गेले दोन दिवस खासगी गाड्या, कोकण रेल्वे, एसटी बसेसच्या माध्यमातून लाखो चाकरमानी आंगणेवाडीत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील कणकवलीपासून आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची समस्या भेडसावत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग