शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज - माधव भांडारी

By सुधीर राणे | Updated: September 26, 2022 14:02 IST

भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत.

कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात व्यवस्था परिवर्तनाचे पर्व सुरू आहे. व्यवस्था परिवर्तन ही केवळ एका रात्रीत घडणारी गोष्ट नसून त्यासाठी मोठे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मोठी हिम्मत लागते. या सगळ्या बाबी नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वात आहेत. व्यवस्थेतील हे सकारात्मक बदल जाणीवपूर्वक जनतेपर्यंत जायला हवेत असे प्रतिपादन भाजप प्रदेशचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी यावेळी केले.भाजपच्या 'सेवा पंधरवडा' या अभियानांतर्गत कणकवली येथील बुद्धिजीवी व्यक्तींच्या संमेलनात 'व्यवस्था परिवर्तनाची २० वर्षे' या विषयावर ते बोलत होते. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, सी.ए., प्राध्यापक, शिक्षक असा प्रज्ञावंत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.माधव भांडारी म्हणाले, काही वर्षांपूर्वी कागदपत्र 'ट्रू कॉपी' म्हणजे अटेस्टेड करण्याची 'व्यवस्था' होती. काही ठिकाणी यासाठी किंमतही मोजावी लागत होती. त्याचा त्रास सहन केलेली आपली पिढी आहे. आता ही व्यवस्था बदलून 'सेल्फ अटेस्टशन' पद्धत आली. हा खूप मोठा दिलासादायक बदल आहे. पण याची कधी चर्चा झाली नाही. त्यामुळे या नवीन व्यवस्थेचे महत्व लोकांच्या लक्षात आले नाही. काही वर्षांपूर्वी इतर विकसित देशांकडून अवहेलना सहन करणारा आपला भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत.नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदाची १२ वर्षे आणि पंतप्रधान पदाची ८ वर्षे अशा २० वर्षाच्या वाटचालीचा आढावा 'मोदी@२०' या पुस्तकात आहे. अनेक मान्यवरांनी त्यात मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवर लिहिलेले आहे. देशातल्या डिजिटल क्रांतीने तर अनेक देशांना मागे टाकलेले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सेवा पंधरवडा या विषयावर  मनोगत व्यक्त केले. संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसन्ना देसाई यांनी आभार मानले. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,शरद चव्हाण, उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी