शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच वैद्यकीय महाविद्यालयाला दंड, परशुराम उपरकर यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: July 19, 2024 16:06 IST

कणकवली:राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने राज्यामधील काही वैद्यकीय महाविद्यालयांना दंड केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश ...

कणकवली:राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने राज्यामधील काही वैद्यकीयमहाविद्यालयांना दंड केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश असून बारा लाखांचा दंड झाला आहे. हा दंड सत्ताधाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच झाला असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळी जाहीर केले. त्यावेळी त्या महाविद्यालयाला आवश्यक असणारी जागा, यंत्र सामग्री आदी बाबींची पूर्तता केल्यानंतरच ते सुरू करा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून प्रतिज्ञापत्र करून आम्ही सर्व  निकष पूर्ण करतो असे सांगितले होते. मात्र, अद्याप पर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही. या महाविद्यालयाचे हे तिसरे वर्ष  असून वैद्यकीय शिक्षकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नाही. तसेच वैद्यकीय शिक्षक नसल्याने ते महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण मंडळाकडे दिले आहे.  असे असतानाही त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने बाह्यरुग्ण विभागातील १० रुग्ण तपासणे गरजेचे आहे.मात्र, सुविधाअभावी बाह्यरुग्ण विभागात रुग्णच नसतात, असे उपरकर यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक असणारी नियमाप्रमाणे २१ एकर जागा उपलब्ध नाही. फक्त नऊ एकर जिल्हा रुग्णालयाच्या जागेमध्येच हे महाविद्यालय  सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान सत्ताधारी लोकप्रतिनिधी करत आहेत. त्या महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षक भरती बद्दल विचारणा केली असता त्यांनी एमपीएससीच्या माध्यमातून जाहिरात दिली आहे .परंतु या महाविद्यालयामध्ये येण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे सांगितले. परंतु या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ शिक्षक कसे आणता येतील यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणते प्रयत्न केले? असा सवालही उपरकर यांनी उपस्थित केला.राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु त्यांच्याजवळ पैसेच नसल्याचे जिल्हा नियोजन समीतीच्या सभेमधून समोर आले आहे. २०० कोटी रुपयांचा आराखडा करून फक्त ८३ कोटी रुपये येतात. तरीही राज्य सरकार विविध घोषणा करत आहे. या घोषणांचा एक भाग म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी तळेरे- विजयदुर्ग रस्ता काँक्रिटीकरण करणार असे सांगितले होते. त्याचे भूमिपूजनही झाले होते. मात्र, त्या कामास अद्यापही सुरुवात केलेली नाही असेही उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयParshuram Upkarपरशुराम उपरकर