शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील युवासेनेचे उपोषण तूर्तास स्थगित!

By सुधीर राणे | Updated: October 26, 2023 15:55 IST

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष ...

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  युवासेनेने गुरुवारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने आंदोलन स्थगित केल्याची माहिती युवा सेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिली.  तसेच उत्तम लोके यांनी धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करत असल्याचे निवेदन प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. आवळे यांना दिले.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री, तालुका समन्वयक गुरूनाथ पेडणेकर, कणकवली उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर आदी उपस्थित होते.युवा सेनेने विविध मागण्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे योग्यसादर केल्या होत्या. त्यामध्ये अपुऱ्या कर्मचारी वृंदामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रुग्णालयात ३० अधिपरिचारिका पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ पदे भरण्यात आली आहेत. बदली  झालेल्या जागी अजून दुसरे कर्मचारी हजर झालेले नाहीत. रुग्णालयात कायमस्वरुपी स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे छोटया मोठया शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत. गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागते.आस्थापनाविभागामध्ये वरीष्ठ लिपीक हे पद व इतर पदे रिक्त झाली आहेत त्याठिकाणी ८ पदे मंजूर असून ७ पदे रिक्त आहेत रिक्त पदावर अद्याप कोणताही कर्मचारी रुजू झालेला नाही. त्यामुळे आस्थापना विभागामध्ये गैरसोय निर्माण झाली आहे. रुग्णालयात सी आर्म मशिन, डॉक्टर, अधिपरिचारिका व अन्य कर्मचारी तातडीने उपलब्ध करावेत. दरम्यान, युवा सेनेने केलेल्या मागण्या अद्याप पर्यत मंजूर केलेल्या नाहीत. तसेच त्याबाबतचे  जिल्हा रुग्णालयाने दिलेले उत्तर समाधानकारक नाही. त्यामुळे त्या काळात यापुढील काही दिवसात या मागण्या मंजूर न झाल्यास ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिला आहे. दरम्यान, युवासेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीhospitalहॉस्पिटल