शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

३१ डिसेंबरला सरकार कोसळणार, आदित्य ठाकरेंचे भाकित

By अनंत खं.जाधव | Updated: November 23, 2023 17:07 IST

..त्यामुळे राज्यात निवडणूक घ्यायला हे सरकार तयार नाही

सावंतवाडी : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीसिंधुदुर्ग जिल्ह्यातून खळा बैठकीचा उपक्रम राबवत थेट सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार 31 डिसेंबरला कोसळणार असल्याचे भाकित केले. तसेच लोकशाही विरोधी असलेले हे सरकार निवडणुका घेण्यास घाबरत असल्याचा आरोपही केला.आदित्य ठाकरे हे गुरूवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माजगाव येथे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व कोलगाव येथे उपतालुका प्रमुख मायकल डिसोझा याच्या घरासमोर खळा बैठका घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी खासदार विनायक राऊत आमदार, वैभव नाईक, पदवीधर मतदार संघाचे प्रमुख किशोर जैन, युवा सेनेचे वरुण सरदेसाई जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना ठाकरे गटाकडून प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठक घेण्यात येत आहे. कोकणात घराच्या समोरील अंगणाला खळा म्हणतात आणि परिसरातील शंभर ते दिडशे लोकांना एकत्र करून बैठक घेण्यात येते तशीच बैठक गुरूवारी आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग व सावंतवाडी येथे घेतली.यावेळी ठाकरे म्हणाले, पुढील वर्षात पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे. ही निवडणूक आपणास जिंकायची असल्यास पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे. घराघरात पोहोचून तेथील पदवीधरांना नोंदणी करण्यास भाग पाडावे. याआधी आम्ही काही मतांनी पडलो परंतु आता पुन्हा एकदा नव्या जिद्दीने आणि ताकदीने या निवडणुकीला सर्वानी मिळून सामोरे जाऊया असे आवाहनही केले.कोकणी जनतेने शिवसेनेला नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. येथील लोकांचे पाठबळ अद्भुत आहे याच लोकांच्या पाठबळाच्या जीवावर पुन्हा एकदा कोकणात आणि मुंबईमध्ये ही पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार असेही ठाकरे म्हणाले.सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती महाराष्ट्र ज्या ताकदीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा आहे ते पाहता सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक घ्यायला हे सरकार तयार नाही. लोकशाहीचा गळा घोटून सत्तेत आलेले खोके सरकार हे 31 डिसेंबरला कोसळणार असल्याचे भाकीतही व्यक्त केले. या वेळी खासदार विनायक राऊत यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे